अभ्यासिकेत पाच वर्षांपासून वीज चोरी

Foto
गुन्हा दाखल करण्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांची टाळाटाळ

पैठण (प्रतिनिधी) _:  पैठणमध्ये महावितरणची मोठी वीजचोरी उघड झाली. परंतु गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने पैठण शहरात हा चर्चेचा विषय बनला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवीन कावसान (पैठण) येथील एका अभ्यासिकेत २०१९ पासून सुरू असलेली लाखो रुपयांची वीजचोरी महावितरणच्या पथकाने या ठिकाणी छापा मारून रंगेहाथ पकडली आहे. या अभ्यासिकेत. ४-५ एसी थेट आकडा टाकून चालवल्या जात असल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी रीतसर पंचनामा केला आहे.

या ठिकाणी वीज चोरी चोरी झाल्याचे निदर्शनास आले असतानाही महावितरणच्या अधिकाऱ्याकडून संबंधित केंद्र चालकावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. जात आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि वीजचोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ वाहुळे यांनी केली आहे. चोरी करणाऱ्यांना पाठीशी न घालता त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश वरिष्ठांनी संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांना द्यावेत. सामान्य माणसाचे एक महिन्याचे बिल थकले तर वीज कापली जाते,

मग लाखो रुपयांची चोरी करणाऱ्यांना अभय का? दिला जात आहे असा आरोपही त्यांनी केला. या संदर्भात महावितरण चे अधिकारी वंगळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की संबंधित अभ्यासिका केंद्र चालकाला आधी बिल देण्यात येईल त्यानंतर संबंधिताने किती दिवसापासून ही चोरी केली आहे हे तपासून त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.