एकाच कुटुंबातील ११ जण नदीत वाहून गेले; सर्वजण शिंपले गोळा करत होते

Foto
बंगळुरु : कर्नाटकातील कारवार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नदीतील शिंपले गोळा करण्यासाठी गेलेल्या मच्छीमार कुटुंबावर रविवार वाढलेल्या पाण्याने घाला घातला. अचानक वाढलेल्या पाण्यात बुडून सात महिलांसह एकरा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली. कारवार जिल्ह्यातील भटकळ तालुकात्यात थट्टेहक्कल गावाजवळ वेंकटपुरा नदीत रविवारी ही दुर्घटना घडली. या अपघाताची माहिती मिळताच शोध मोहिम राबविण्यात आली. तिघांना वाचविण्यात यश आले आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार,उमेश नायक (वय ३०), लक्ष्मी महादेव नायक (४२), लक्ष्मी नायक (३०), लक्ष्मी अन्नप्पा नायक ६०), लक्ष्मी शिवराम नायक (४९), ज्योती नागप्पा नायक (३४), मालती नायक (३४), मास्तम्मा नायक (३८) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण भटकळ येथील शिराली गावचे रहिवासी होते.

नायक कुटुंबातील १४ जण थट्टेहक्कल नदीत रविवारी शिंपले गोळा करण्यासाठी गेले होते. शिंपले गोळा करत असताना एकमेकांचा हात धरून चालत होते. पण, शनिवारी रात्री उशिरा झालेल्या पावसामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला. समुद्राच्या भरतीमुळे नदीचा प्रवाह संथ होऊन पाण्याची पाण्याची पातळी वाढली होती.

वाढलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांना नदीतून बाहेर येता आले नाही. यामुळे ते १४ जण पाण्यात बुडाले. यामधील चार जणांना बाहेर काढण्यात आले. पण, त्यातील एकाचा मृत्यू झाला. यामध्ये नागरत्ना व महादेवी यांच्यासह आणखी दोघांचा समावेश आहे. त्यांना उपचारांसाठी मणिपालला नेण्यात आले. महिलांना पोहता येत नसल्याने बहुतांशी महिला बुडाल्या.

पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केले 
पंतप्रधान मोदींनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आणि नुकसान भरपाई जाहीर केली. पंतप्रधानांच्या एक्स हँडलवरून पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, कर्नाटकातील कारवार जिल्ह्यातील दुःखद घटनेबद्दल ऐकून मला तीव्र धक्का बसला आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती माझ्या संवेदना आहेत.