छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): शूरवीर महाराणा प्रताप जयंती उत्सवानिमित्त शहरात आज मोठा उत्साह आहे. शूरवीर महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीतर्फे आज सकाळी शहरात भव्य रॅली काढून शूरवीर महाराणा प्रताप यांच्या जयंतीचा उत्सव साजरा केला. यावेळी शूरवीर महाराणा प्रताप की जय.., राणा की जय बोलो, सांगा की जय बोलो... जय राणा... असा जयघोष करण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसर शूरवीर महाराणा प्रताप यांच्या जयघोषाने दुमदुमला.
शूरवीर महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळपासूनच शहरात मोठा उत्साह असून मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शूरवीर महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीच्या वतीने आज सकाळी सिडको येथील महाराणा प्रताप उद्यानात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर शहरातून भव्य मोटरसायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली.
मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजी आणि जयघोषांच्या वातावरणात ही रॅली उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात आली. युवकांनी भगवे ध्वज हातात घेऊन महाराणा प्रताप यांच्या शौर्याचा जयघोष केला. ही रॅली सिडकोतील महाराणा प्रताप उद्यान येथून सुरू होऊन बजरंग चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, सिडको बसस्थानक, बाबा पेट्रोल पंप, क्रांती चौक, चेतक घोडा, पुंडलिकनगर मार्गे पुन्हा महाराणा प्रताप उद्यान येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीसाठी विविध मान्यवर आणि समाजातील पदाधिकार्यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी जयंती उत्सवाचे अध्यक्ष सचिन बैनाडे, काळुराम सिंगल, एल.डी ताटू, कवरसिंग बैनाडे, खुशालसिंग परदेशी, अंजली कोकुल्डे, रामसिंग डोभाळ, लता ठाकूर, पदमसिंग राजपूत,भारती राजपूत, डॉ. जीवन राजपूत, भागवत बिघोत फुलसिंग राजपूत, विजय राजपूत, भरतसिंग घुनावत, आनंद बारवाल, त्रिंबक राजपूत, नारायण महेर, प्रेमसिंग चुगडे, भिमसिंग टमाटे, सुभाष महेर, जादुसिंग वैजापूर, तोताराम बहुरे, कैलास जोनवाल, प्रविण राजपूतसह आदीं समाजातील युवक-युवती, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. संपूर्ण शहरात शूरवीर महाराणा प्रताप यांच्या शौर्यगाथेचे स्मरण करत जयंती उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.












