सहकार महर्षी माणिकराव पालोदकर विद्यालयात प्रवेशोत्सव

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): पालोद येथील सहकार महर्षी माणिकराव पालोदकर विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्याचे पुष्पगुच्छ देऊन प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. दीड दोन महिन्याच्या खंडानंतर विद्यार्थी नियमित शाळेत येण्यासाठी व विद्यार्थ्यांना शाळेची गोडी वाढवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी उन्हाळी सुट्ट्यांपासून कपाटात विसावलेला गणवेश विद्यार्थ्यांच्या अंगावर चढलेला दिसला तर शाळेच्या प्रागणात पहिल्यांदाच पाऊल टाकणाऱ्या चिमुकल्यांनी नव्याकोऱ्या गणवेशाची नवलाई अनुभवतांनी दिसून आले. चिमुकल्या मुलांनी पुस्तकांचा खास गंध श्वास भरून घेतला आणि सुटीत थोडे दूर गेलेल दप्तर, डबा यांच्याशी नव्याने मैत्री केली. याप्रसंगी कुणी स्कूल बसने, कुणी पाई, कुणी रिक्षामामां सोबत तर कुणी बाबांच्या गाडीवरून तर कुणी आईचं बोट धरून शाळेत आले. 

शाळेकडून सुधा फुगे, फुलांच्या माळा, रांगोळ्या काढून, व मुलांना मोफत पुस्तके वाटप करत मुलांचे स्वागत करण्यात आले. शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे आजूबाजूंच्या खेड्यातील बहुतांश पालक आपल्या मुलांना शाळेत पोहोचवण्यासाठी आले होते. 

याप्रसंगी पाचवीच्या मुलांच्या चेहऱ्यावर भीती होती. तर थोड्या मोठ्या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मात्र, खुप दिवसांनी भेटलेल्या मित्रमैत्रिणींना भेटून गप्पा मारत शाळेचा पहिला दिवस आनंदाने साजरा केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप कानडजे यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा
दिल्या व शाळेत नियमित उपस्थित राहून, अभ्यास करण्याचा सल्ला दिला. 

याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक दिलीप जाधव, सुनील तांबे, कृष्णा भांडारे, राजेश ठोंबरे, कृष्णा पाटील, योगेश निंभोरे, सुनील सागरे, योगेश निंभोरे, प्रफुल कळम, गजानन सपकाळ, संजय जाधव, डॉ. रमेश काळे, महादेवी ठवरे, जयश्री चापे, संतुकराव मोरे, अक्षय निकम उपस्थित होते. विद्यार्थी पालकांच्या उपस्थित कार्यक्रम झाला.