झाडे वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी एकवटले

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) ः नगर नाका ते दौलताबाद टी पाँइंट या रस्त्यासाठी वारसा वृक्षासह वडाची अंदाजे १ हजार मोठी झाडे तसेच गरवारे स्टेडीयम येथे आंतरराष्ट्रीय स्टेडीयमसाठी ७५ झाडांची कत्तल होणार आहे. या निर्णयाच्या विरोधात शहरातील वृक्ष, पर्यावरण प्रेमी नागरिकांनी शनिवारी (दि.५) गरवारे स्टेडियम येथे घोषणा देऊन आंदोलन केले. 
या वेळी शहरातील महिला, युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी पर्यावरणाचे रक्षण करा, झाडे वाचवा, विकास हवा भकास नको अशा घोषणा या वेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.