अंधश्रध्दा निर्मूलन, जादूटोणा विरोधी जनजागृतीचे आयोजन

Foto
कन्नड, (प्रतिनिधी) : येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग समाज कल्याण सहाय्यक आयुक्त व एकता बहुउद्देशीय महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अंधश्रध्दा निर्मूलन जादू टोणाविरोधी कायदा प्रचार व प्रसार करण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विजय भोसले, प्रमुख पाहुणे म्हणून पोउनि. गाडेकर, भाऊसाहेब पठाडे, प्रमुख वक्ते विक्रांत करेवार, रंगनाथ लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धे तील विजेते प्रतिक्षा जाधव स्व. के. के जाधव विद्यालय, आदित्य धुमाळ संत ज्ञानेश्वर विद्यालय, सिद्धी हिवाळे साने गुरुजी
विद्यालय, लावण्या गिरी आजूबाई विद्यालय, सिद्धी देवरे सावित्रीबाई फुले विद्यालय यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. 

यावेळी प्रमुख वक्ते विक्रांत करेवार यांनी आपल्या मनोगताद्वारे तर भाऊसाहेब पठाडे यांनी प्रयोग व प्रात्यक्षिकांद्वारे विज्ञानाविषयी विद्यार्थ्यांनी सजग दृष्टिकोन बाळगावा अंधश्रद्धा बाळगू नये यासाठी अनमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण अधिकारी आशा लखाडे मॅडम यांनी केले. सूत्रसंचलन प्रवीण दाभाडे यांनी तर आभार वृषाली खंडागळे यांनी मानले.