औरंगाबाद : जनतेने दिलेला कौल मला मान्य असुन मी माझा पराभव स्विकार करतो. लोकशाहीत जनता सर्वोपरी असते. विजय कुणाचाही झाल असला तरी मैन ऑफ़ द मैच मीच आहे असे शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे.
तुमाच्यामुळे चंद्रकांत खैरे पडले असा अरोप होत आहे. याविषयी तुम्हाला काय वाटते असे विचारले असता, माझ्यामुळे कुणाचाही पराभव झालेला नाही. जनतेने खैरेंचा पराभव केला असे जाधव यांनी म्हटल आहे. जनतेने मला भरभरुन मते दिली. एका अपक्ष उमेदवाराला एव्हढे प्रचंड मताधिक्य मिळणे साधी गोष्ट नाही. ज्या लोकांनी मला पाठिंबा दिला त्या सगळ्यांचे मी आभार मानतो असेही ते पत्रकाराशी बोलतना म्हणाले. यापुढे आपण कुठल्याही पक्षात जाणार नाही असे म्हणत त्यानी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला.
विधानसभेसाठी देणार उमेदवार
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवस्वराज्य बहुजन पक्ष जिल्ह्यात आपले उमेदवार उभे करेल. जिल्ह्यातच नाही तर राज्यात जिथे कुठे उमेदवार निवडून येण्याची शक्यता असेल तिथे उमेदवार देणार असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे.