पाणी वाढल्यानंतरही पाच टाक्याचांच होणार वापर

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): नव्या २,७४० कोटी रुपयांच्या पाणी योजनेअंतर्गत वाढीव २०० एमएलडी पाणी टप्प्याटप्प्याने घेतले जाईल. १ मेपासून शहरात पाणी आले तरी पहिले पाच टाक्यांचा वापर होईल, असे महापालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी सोमवारी (दि. १३) सांगितले.
याबाबत पत्रकारांसोबत बोलताना येडगे म्हणाले, नव्या पाणी योजनेचा नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंच्या कामाचा आढावा घेतला. २,५०० मिलिमीटर व्यासाच्या पाइपलाइनमधून सोमवारी (दि.१३) सायंकाळपर्यंत पाणी जलशुद्धीकरण केंद्रात येणे अपेक्षित आहे; तसे झाल्यास पुढील दोन आठवडे आवश्यक कामे करण्यात येतील. जलवाहिनी स्वच्छ झाल्यानंतर जलशुद्धीकरण केंद्र सुरू केले जाईल. त्यासाठी आवश्यक परवानगी घेण्याचे काम सुरू आहे. अडचणी आल्या नाहीत तर न्यायालयाने दिलेल्या १ मेच्या डेडलाइननुसार पाणीपुरवठा सुरू होऊ शकतो. वाढीव २०० एमएलडी पाणी टप्प्याटप्प्याने घेतले जाईल. शहरातील पाण्याच्या साठवण क्षमतेनुसार हे पाणी घेऊ, असे येडगे म्हणाले. सध्या पाच टाक्यांचा वापर सुरू आहे. या टाक्यांच्या परिसरात नव्या पाणी योजनेचे पाणी देता येईल, त्यामुळे जुन्या योजनांचे पाणी इतर भागांत वळवून वेळापत्रकात सुधारणा करत येऊ शकते, असेही येडगे म्हणाले. दरम्यान त्यांनी लीक डिटेक्शन मशीनने जलवाहिनीची तपासणी करण्याबाबत आदेश दिले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions