यांना पोरं झाले तरी म्हणतील संजय राऊतांमुळेच संजय राऊतांचा घणाघात

Foto
मुंबई : मनोज जरांगेंकडे असलेली क्लिप ही संजय राऊत यांनीच बनवली आहे. उबाठाच्या वॉररुममध्ये ही क्लिप तयार करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. भाजपच्या लोकांना काही काम राहिलं नाही. त्या क्लिपमधील आवाज स्पष्ट कळत आहेत. उगाचच हे लोक काहीही बोलत आहेत. उद्या ते आणखी काहीही बोलतील. यांना पोरं झाली तर संजय राऊतांमुळेच झाली म्हणून बोंब करतील, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

 मी मनोज जरांगे यांचे आभार मानेल. त्यांनी एका मोठ्या प्रकरणाला वाचा फोडली. त्यांनी राजकारण्यांचा विद्रूप चेहरा देशासमोर आणला. त्यानंतर भाजपवाले जे बोलत आहे, ते हस्यास्पद आहे. मूर्खपणाचं आहे. संजय राऊत यांनी ही टेप तयार केली म्हणणं हे हस्यास्पद आहे. लोक त्यांना हसत आहेत. हे त्यांना कळत नाही. उद्या ते काहीही बोलू शकतात. यांना पोरं झाले तरी म्हणतील संजय राऊतांमुळे झाली. या लेव्हलला ही लोकं आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

५०० कोटींची ईडी चौकशी करण्याची मागणी
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या ५०० कोटींच्या आरोपानंतर खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र पाठवले आहे.  हे सर्व प्रकरण पीएमएलए कायद्याअंतर्गत येत असून याचा तपास ईडीकडे सोपवण्याची विनंती संजय राऊत यांनी या पत्राद्वारे अमित शाह यांना केली आहे. 

संजय राऊत यांनी सोशल मीडियावर या पत्राच्या प्रतीचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये संजय राऊत यांनी अमित शाह यांना म्हटले आहे की, आतापर्यंत भाजप खासदार, आमदार, राजकीय पक्ष आणि निवडणुका विकत घेत होता. आता त्यांनी आंदोलनेही विकत घ्यायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील ५०० कोटी रुपयांचा विषय आतापर्यंत तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल. आतापर्यंत भाजप खासदार, आमदार, राजकीय पक्ष आणि निवडणुका विकत घेत होता. आता त्यांनी आंदोलनेही विकत घ्यायला सुरुवात केली आहे. भाजपने श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत मनोज जरांगे पाटील यांना द्यायला ५०० कोटी रुपये दिल्याचे सांगितले जात आहे. हे पैसे कुठून आले? आणि ते खरोखर जरांगे यांच्यापर्यंत पोहोचले की नाही? या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. हे प्रकरण प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग अ‍ॅक्ट अंतर्गत येते. कृपया या प्रकरणाचा तपास एनफोर्समेंट डायरेक्टोरेट ईडीकडे सोपवावा, अशी मागणी संजय राऊत यांनी पत्रात केली आहे.