वीर जिवाजी महाले यांचे जीवनकार्य प्रत्येकाने आत्मसात करावे : आ. अब्दुल सत्तार

Foto
वीर जिवाजी महाले यांना अभिवादन

सिल्लोड, (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत अंगरक्षक वीर जिवाजी महाले यांचे शौर्य, त्याग, स्वाभिमान आणि स्वराज्याप्रती असलेली निष्ठा प्रेरणादायी आहे. 

स्वराज्याच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता वीर जिवाजी महाले यांनी बजावलेली भूमिका इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवली गेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचविण्यात त्यांनी बजावलेली कामगिरी ही महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासातील अभिमानास्पद घटना आहे. वीर जिवाजी महाले यांचे जीवनकार्य प्रत्येकाने आत्मसात करावे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी केले.

 सिल्लोड शहरातील शिक्षक कॉलनी परिसरातील वीर जिवाजी महाले चौकात वीर जिवाजी महाले यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी वीर जिवाजी महाले यांच्या नामफलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थित समाजबांधवांशी संवाद साधला, याप्रसंगी ते बोलत होते. वीर जिवाजी महाले यांनी स्वराज्याच्या कार्यात दाखविलेली अतुलनीय निष्ठा, प्रसंगावधान आणि धाडस हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वपूर्ण पैलू होते. 

प्रतिकूल परिस्थितीतही कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्षणासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या शौर्यगाथेतून निष्ठा, धैर्य, कर्तव्य परायणता आणि स्वाभिमान यांची प्रेरणा मिळते. अशा महापुरुषांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचेही आमदार अब्दुल सत्तार यांनी नमूद केले.

यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे यांनी वीर जिवाजी महाले यांच्या शौर्याची, स्वराज्याप्रती असलेल्या निष्ठेची आणि ऐतिहासिक योगदानाची माहिती देत नव्या पिढीने अशा महापुरुषांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी, असे त्यांनी सांगितले. 

कार्यक्रमास उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, शिवसेना गटनेते सुधाकर पाटील, नगरसेवक सत्तार हुसेन, शेख बाबू शहा, सिद्धेश्वर आहेर, सुधाकर गायकवाड, सुनील दुधे, जगदीश बेदवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, युवासेनेचे शिवा टोम्पे, अक्षय मगर, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, लताबाई जाधव, शामराव दौड, नारायण फाळके, दौलत भारती, राजू साठे, अमरसिंग राजपूत, सुरेश शर्मा, प्रकाश कोठाळे, आशिष कुलकर्णी, नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष संतोष बोराडे, तालुकाध्यक्ष राजू सुरडकर, शहराध्यक्ष दीपक वाघ यांच्यासह कृष्णा वाघ, दिलीप वाघ, सुरेश वाघ, संतोष वाघ, पंडित बोर्डे, महेश वाघ, सुधाकर पंडित, अजय वाघ, अशोक वरपे, बाळू सुरडकर, रत्नाकर वाघ, रामेश्वर वाघ, भिकन शिंदे, विजय पंडित, पुंडलिक वाघ, योगेश पंडित, नारायण वाघ, संजय सुरडकर, मनोज वाघ, अशोक बिडये, ज्ञानेश्वर बोराडे, पंढरी वरपे, विलास वाघ, प्रभाकर सुरडकर, राम तसेवाल, दिगंबर वैद्य, अनिकेत वैद्य, बबलू वाघ, रोहित वाघ, अंबादास वाघ, अशोक जाधव, सुखदेव सोळुंके, वैशाली वैद्य, संगीता सुरडकर, जिजाबाई वैद्य, सरोजिनी पंडित, नंदाबाई वाघ, सुरेखा सुरडकर, चंद्रकला सुरडकर, माधुरी बोराडे, अर्चना वाघ, कावेरी वाघ यांच्यासह समाजबांधव व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.