लिहाखेडी येथे श्रीमद् भगवत गीता ग्रंथावर आधारित परीक्षा

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : राष्ट्रीय युवा दिन, स्वामी विवेकानंद व राजमाता मॉ जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही लिहाखेडी येथे श्रीमद् भगवत गीता या अखिल विश्वातील पवित्र ग्रंथांवर आधारित दि. १२ जानेवारी रोजी स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

या परिक्षेसाठी लहान गटासाठी इयत्ता ४ थी ते ७वर्गातील विद्यार्थी तर मोठ्या गटासाठी इयत्ता आठवी ते दहावी आणि इयता ११ वी पासून पुढील वर्ग असे तीन गटासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय, स्वतंत्र बक्षिसे देण्यात येणार आहे. तर मकर संक्रांतीच्या दिवशी १४ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता लिहा खेडी हनुमान मंदीरासमोर श्री मद् भगवत गीता या विषयावर गीता प्रचारक  सत्यभामा प्राण प्रभु यांचे प्रवचन असुन याच दिवशी मान्यवराच्या हस्ते स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. 

या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजक हरिदास साखळे, विनोद चव्हाण, गणेश बावस्कर, विष्णू फरकाडे व मानव कल्याण परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.