खंडणीखोर राहुल चाबुकस्वार टोळीला दुसऱ्यांदा मोक्का

Foto
टोळीतील सहा जणांच्याही आवळल्या मुसक्या
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट आणि नागरिकांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या गारखेडा परिसरातील कुख्यात गुंड राहुल साहेबराव चाबुकस्वार आणि त्याच्या टोळीविरुद्ध पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी पुन्हा कठोर कारवाई केली. लूटमार, खंडणी आणि अवैध सावकारीसंदर्भातील दोन गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर १५ दिवसांत या टोळीवर दुसऱ्यांदा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली. डझनभर गंभीर
गुन्हे दाखल असलेला चाबुकस्वार फरार असून, टोळीतील सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
एमआयडीसी सिडको ठाण्यात ३ ऑक्टोबर २०२६ रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, तक्रारदार ज्ञानेश्वर दादासाहेब बारे हे ३० सप्टेंबर २०२६ रोजी आर्किटेक्ट सुभाष जोशी यांच्याकडे बांधकाम साईटवरील मजुरांचे पेमेंट आणि साहित्याची खरेदी करण्यासाठी कारमधून ७लाख २५ हजार
रुपयांची रोकड घेऊन गेले होते. त्यावेळी सुधीर कातकडे, शिवाजी कातकडे, टोळीप्रमुख राहुल चाबुकस्वार आणि त्यांच्या इतर साथीदारांनी बारे यांना अडवले. आरोपींनी बारे यांची भररस्त्यातच रोकड आणि गाडी लुटून नेली. यापूर्वीही पैशांच्या जुन्या व्यवहारावरून फिर्यादीला वारंवार धमकावण्यात आले होते. 'या' १५ गुंडांवर आवळला फास राहुल साहेबराव चाबुकस्वार (४७, रा. हुसेन कॉलनी, गारखेडा), निलेश
उर्फ सुरेश नारायण रांजणे (३०, रा. न्यायनगर), अमोल शामराव साळुंके (२५, रा. गणेशनगर), आकाश शामराव साळुंके, सुधीर गोरख कातकडे, अलीम बुढण शेख (२७, रा. देवळाई), सागर हरिदास किर्तीकर (३५, रा. अयोध्यानगर), सुनिल शिंदे, आकाश पंडित गायकवाड (३०, रा. चौधरी कॉलनी), सचिन कल्याण मुगदल (२३), अजय सुभाष डोखळे (२७), आकाश हरिभाऊ मुखेदल (२२, तिघे रा. मसनतपूर), संदीप, विशाल सावंत आणि अजय रगडे अशी आरोपींची नावे आहेत.
गंभीर गुन्ह्याची नोंद
राहुल चाबुकस्वार याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून शहरात दहशतीचे साम्राज्य उभे केले होते. टोळीवर यापूर्वी खंडणी उकळण्यासाठी अपहरण करणे, दरोडे टाकणे आणि प्राणघातक हल्ले करणे. बलात्कार आणि बालकांचा लैंगिक छळ करणे. खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे आणि बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगणे. शासकीय सेवकांना कर्तव्यात अडथळा आणून धमकावणे, तडीपारी आदेशांचे वारंवार उल्लंघन करणे, नागरिकांची घरे व जागांवर बेकायदेशीर अतिक्रमण करून दमदाटी करणे, अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने ही टोळी समाजासाठी घातक बनली होती.
https://epaper.sanjwarta.in/Powered Byruar Bolutions Powered By: Vrudhee