शालेय पोषण आहारावर 'एफडीए'ची नजर

Foto
विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी जिल्ह्यातील ३ हजारांवर शाळांना नवे नियम लागू
(सांजवार्ता ब्युरो): विद्यार्थ्यांना मिळणारा शालेय पोषण आहार अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी व्हावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कडक नियमावली लागू केली आहे. या निर्णयाचा फायदा जिल्ह्यातील ३ हजार १५८ शाळांमधील विद्यार्थ्यांना होणार आहे. छत्रपती संभाजीनगर,
नव्या स्वच्छता, नियमांनुसार शाळांमधील स्वयंपाकघराची शुद्ध पिण्याचे पाणी, दर्जेदार धान्याचा वापर आणि भांड्यांची निगा यावर विशेष भर दिला जात आहे. तसेच आहार शिजवणाऱ्या मदतनिसांना स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक करण्यात आले असून, यामुळे पोषण आहाराचा दर्जा उंचावण्यास मदत होणार
असल्याचा दावा शालेय पोषण आहार विभागाने केला आहे.
३ जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील हजार १५८ शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या साडेचार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ दिला जात आहे. शासनाच्या निर्धारित निकषांनुसार विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार पुरविला जात असून त्यासाठी आवश्यक तांदूळ व इतर धान्याचा नियमित पुरवठा केला जातो. त्यानुसार इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ४५० ग्रॅम प्रथिनयुक्त, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ७५० ग्रॅम प्रथिनयुक्त आहार दिला जातो. विद्यार्थ्यांना सकस व संतुलित आहार मिळावा, यासाठी आवश्यक घटकांचा समावेश करण्यात येतो.
नव्या सूचना
आचारी व मदतनिसांची नियमित आरोग्य तपासणी. स्वयंपाकघर, भांडी, पिण्याचे पाणी व धान्याची स्वच्छता. डाळ, तेल, मसाले व भाजीपाल्याचा दर्जा आणि मुदतवैधता तपासावी. विद्यार्थ्यांना जेवण देण्यापूर्वी मुख्याध्यापक, शिक्षकांनी चाखून पाहावे. तयार अन्नाचा नमुना २४ तास सुरक्षित ठेवला जावा. हातमोजे, टोपी, अॅप्रनचा वापर व हात स्वच्छ धुण्यात यावे. धान्य व खाद्यसाहित्य स्वच्छ, कोरड्या, सुरक्षित ठिकाणी साठवावे, विद्यार्थ्यांना गरम, ताजे व पौष्टिक अन्न द्यावे; शिळे अन्न देण्यास मनाई.
२५ विद्यार्थ्यांसाठी एक मदतनीस
पोषण आहार योजनेअंतर्गत एका शाळा मदतनिसाला दरमहा २,५०० रुपये मानधन दिले जाते. २५ विद्यार्थ्यांमागे एक मदतनीस, ५० विद्यार्थ्यांसाठी दोन मदतनीस, तर १,००० विद्यार्थ्यांपर्यंत दहा मदतनीस नियुक्त करण्याचा नियम आहे. संबंधित शाळेतील मदतनिसांची नियुक्ती करण्याचे अधिकार शालेय व्यवस्थापन समितीला दिले आहेत.
ताजा भाजीपाला
66 एफडीएच्या नवीन नियमांचे पालन केले जात असून नुकताच शासनाकडून तांदूळ व खिचडीसाठी लागणाऱ्या धान्याचा पुरवठा झाला आहे. टोमॅटो, कांदा, कोबीसह ताजा भाजीपाला बाजारातून आणला जातो. दररोज तयार केलेल्या खिचडीतील एक नमुना तपासणीसाठी बाजूला ठेवला जातो. अचानक अधिकारी कधीही येऊन तपासणी करतात. भाजीपाला व पूरक आहारासाठी वेगळे मानधनही शासनाकडून दिले जाते.
जी.टी. पदार, मुख्याध्यापक, लोहगड हायस्कूल, आडगाव (सरक)
66 या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रत्येक तालुक्यात दरमहा दोन शाळांच्या पोषण आहाराची तपासणी केली जाते. अन्न तयार करण्यापासून ते विद्यार्थ्यांना वाढप होईपर्यंत स्वच्छता, गुणवत्ता आणि सुरक्षिततेची पाहणी केली जाते. - संतोष गोरे, अधीक्षक, शालेय पोषण आहार
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions