'बिकानेर मिठाईवाला'वर एफडीएचा छापा

Foto
सांजवार्ता
Page No.: 6 Date: 29/10/2026
'बिकानेर मिठाईवाला'वर एफडीएचा छापा
बजाजनगरात कारवाई : भेसळयुक्त मिठाई नष्ट
नमुने प्रयोगशाळेत चाचणीसाठी
मिठाई व कच्चा माल निकृष्ट दर्जाचा आणि भेसळयुक्त असल्याचा संशय आला. सदर यशस्वी कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या पथकाद्वारे करण्यात आली. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन, छत्रपती संभाजीनगर विभागाचे सह आयुक्त (अन्न) एस. आर. करकळे आणि सहाय्यक आयुक्त (अन्न) डी. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली. जप्त केलेल्या सर्व अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळा चाचणीसाठी पाठवण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कायद्यानुसार पुढील कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) :
सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत सणासुदीच्या अनुषंगाने एफडीएच्या वतीने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. त्यात बजाजनगर येथील मेसर्स बिकानेर मिठाईवाला बजाजनगर, वाळूजवर धडक कारवाई करण्यात आली. मेसर्स बिकानेर मिठाईवाला उत्पादनाचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.
मिठाई प्रतिष्ठानावर छापा टाकून एकूण १९ हजार ३१० रुपये किमतीचा ६३.५ किलो संशयास्पद, निकृष्ट व भेसळयुक्त मिठाई आणि
अन्नपदार्थांचा साठा जागेवरच नष्ट करण्यात आला आहे. बिकानेर मिठाईवाला बजाजनगर, वाळूज या प्रतिष्ठानावर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ही धडक कारवाई केली. सदर दुकानात विक्रीसाठी साठवून ठेवलेला मावा, कलाकंद, काजू कतली आणि विविध प्रकारचे लाडू अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ च्या नियमांचे उल्लंघन करून बनवलेले तसेच निकृष्ट व भेसळयुक्त असल्याचा प्राथमिक संशय आल्याने ते जप्त करण्यात आले आहे. तसेच सदर प्रतिष्ठानाचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions