संशयित अन्नपदार्थांचे घेतले नमुने
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): इमरतीसाठी प्रसिद्ध असलेल्या जुन्या शहरातील गुलमंडी परिसरातील एका मिठाई भांडारावर बुधवारी (दि.२२) सायंकाळी अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला. या कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी हॉटेलमधील खाद्यतेल, मिठाई, फरसाणसह विविध पदार्थ तपासले. काही संशयित अन्नाचे नमुने जप्त केले आहेत. एफडीएच्या या कारवाईमुळे शहरातील खाद्यपदार्थ विक्रेते आणि भेसळ करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
अन्न व औषधी प्रशासनाच्या
आयुक्तपदी तुकाराम मुंडे आल्यापासून अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी राज्यभर कारवाईचा धडाका सुरू रद्द आहे. शहरासह जिल्ह्यात अन्न प्रशासनाकडून कारवाई केल्या जात आहे.
आतापर्यंत अनेक हॉटेल्स, बिर्याणी हाऊस, ज्युस सेंटरवर कारवाई करत परवाने रद्द करण्यात आले. बुधवारी अन्न प्रशासन अधिकाऱ्यांनी जुन्या
शहरातील गुलमंडीवरील प्रसिद्ध अशा मिठाई भांडारवर अचानक छापा टाकला. तीन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मिठाई भांडारमधील जिलेबी, इमरती, पेढा, फरसाण यासह विविध खाद्यपदार्थ, कच्चा माल, तसेच खाद्यतेल, मिठाईत वापरले जाणारे खाद्यरंगाचे प्रमाण, त्याची एक्सपायरी डेट, लेबलिंगची तपासणी केली. मिठाईचे ट्रे, कढाई यासह इतर खाद्यपदार्थांसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, स्वच्छता, पिण्यायोग्य पाण्याचा वापर होत आहे का, याचीही पाहणी केली. अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत नोंदणी आहे का, यासह विविध कागदपत्रांची पडताळणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
मिठाई भांडारचाही परवाना
मिठाई भांडारमध्ये तपासणीत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना अनेक संशयास्पद बाबी आढळून आल्या. काही संशयित नुमने पथकाने तपासणीसाठी जप्त केले. त्याचा रिपोर्ट येईपर्यंत मिठाई भांडार बंद ठेवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions









