३१ नंतर होणार गुंठेवारी कक्ष बंद; अडीच महिन्यांत मनपा तिजोरीत ८० कोटी जमा
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी देण्यात आलेल्या सवलतीच्या मुदतीचा आता अंतिम टप्पा सुरू झाला आहे. या विशेष सवलतीचा लाभ घेण्यासाठी गुंठेवारी कक्षात दररोज १५० ते २०० प्रस्ताव दाखल होत असून, अवघ्या अडीच महिन्यांत मनपाच्या तिजोरीत ८० कोटी रुपयांची भर पडली आहे. ही नियमितीकरण प्रक्रिया आगामी ३१ ऑक्टोबरपर्यंतच सुरू राहणार असून, त्यानंतर गुंठेवारी कक्ष कायमचा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे मुदतीत अर्ज न करणाऱ्या नागरिकांची बांधकामे
अनधिकृत ठरवून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे.
महापौरांनी २० टक्के प्रशमन शुल्कातूनही सूट देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी नगररचना विभागामार्फत परिपत्रक
चालानसाठी १५ दिवसांची प्रतीक्षा
▶ महापालिकेच्या गुंठेवारी विभागामार्फत सुरू असलेल्या नियमितीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, चालान मिळविण्यासाठी १५-१५ दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने गुंठेवारी नियमितीकरणाच्या प्रक्रियेलाच विलंब होत आहे. गुंठेवारी विभागातील प्रत्येक मनपा अभियंत्याला केवळ दोन चालान पुस्तिका देण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. दुसरीकडे, खासगी एजन्सीचे अभियंते दीडशेहून अधिक आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने अर्ज आणि प्रकरणे असताना उपलब्ध चलन पुस्तिका अपुऱ्या पडत आहेत. परिणामी चलन घेण्यासाठी नागरिक व आर्किटेक्ट यांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे खासगी आर्किटेक्टही त्रस्त झाले आहेत.
काढून ही सवलत लागू केली. मात्र, तिची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंतच निश्चित करण्यात आली आहे.
या योजनेत घरांच्या बांधकामासाठी बेटरमेंट चार्जमधून सूट आणि २० टक्के प्रशमन शुल्क रद्द झाल्याने कमी खर्चात नियमितीकरणाची संधी उपलब्ध
झाली आहे. खुल्या भूखंडांनाही ५० टक्के बेटरमेंट चार्जमधून सवलत मिळत असल्याने मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होत आहेत. सध्या दररोज सुमारे १५० ते २०० संचिका दाखल होत आहेत. या मोहिमेमुळे महापालिकेच्या महसुलातही भर पडली असून, अवघ्या
अडीच महिन्यांत सुमारे ८० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मात्र, ३१ ऑक्टोबरनंतर गुंठेवारी कक्ष बंद केला जाणार आहे. त्यानंतर नियमितीकरण न झालेल्या बांधकामांवर अनधिकृत बांधकाम म्हणून कारवाई केली जाणार आहे.
https://epaper.san/warta.in/Powered By: Vrudhee Solutions















