सोशल मीडियावरील बनावट भरती

Foto
जाहिरातींपासून सावध राहा : आरोग्य विभाग
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात वर्ग-३ (बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी) आणि वर्ग-४ (स्वच्छता कर्मचारी) पदांची भरती सुरू असल्याचे खोटे मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नागरिक व नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सध्या अशी कोणतीही अधिकृत
भरती प्रक्रिया सुरू नसून सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्टीकरण जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी दिले आहे.
नोकरीचे आमिष दाखवून पैसे, वैयक्तिक माहिती किंवा कागदपत्रे मागणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच संशयास्पद लिंकवर किल्क करू नये किला कोणतेही शुल्क भरू नये, असेही सांगण्यात, आले आहे. अप्रमाणित माहितीची खातरजमा न करता ती इतरांना
फॉरवर्ड किंवा शेअर करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
भविष्यात या किंवा इतर कोणत्याही पदांची भरती जाहीर झाल्यास त्याबाबतची अधिकृत माहिती केवळ जि.प. छत्रपती संभाजीनगरच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच शासनमान्य प्रसिद्धी माध्यमांद्वारेच प्रसिद्ध केली जाईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. ही सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मित्रू पी. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली जारी करण्यात आली आहे.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions