ज्ञात हल्लेखोरांनी व्यापारी कुटुंबावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले आहे. हा हल्ला वयक्तिक वैमनस्यातून, व्यवहारातून झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र जखमीच्या जबाबा नंतरच पुढील तापास चक्रे फिरवली जाणार आहे. दरम्यान आज सकाळी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी रघुवीर नगर येथील घटनास्थळाची पाहणी केली.
पारस छाजेड वय ७८ , शशिकला छाजेड वय ७०, पार्थ आशिष छाजेड वय १७ (सर्व राहणार रघुवीरनगर, जलनारोडलगत ) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री छाजेड कुटुंबीय घरात असताना दरवाज्याचे बेल वाजली व दरवाजा उघडताच पारस यांच्या वर कोयत्याने वार करण्यात आले.त्याच्या मदतीसाठी धावून आलेल्या शशिकला यांच्यावर हल्ला करण्यात आला आरडाओरड एकूण त्यांचा नातू पार्थ हा धावून आला असता त्यावरही प्राणघातक हल्ल करण्यात आला तिघांनाही रक्तबंबाळ अवस्थेत पाहून पार्थच्या आईने स्वतःला एका खोलीत कोंडून घेत आरडाओरड केली.त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिकांनी घराकडे धाव घेतली .नागरियेत असल्याचे पाहून हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले.नागरिकांनी तातडीने तिन्ही जखमींना जालनारोड लगतच्या एका खाजगी रुग्णल्यात उपचारासाठी दाखल केले. जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
घरातून कुठलीही मौल्यवान वस्तू, पैशे, दागिने चोरीला गेलेले नाही. हा हल्ला कोणी केला, कोणत्या कारणाने केला ,हल्ला करणारे कितीजण होते. हे वृत्तप्रकाशीत होई पर्यंत स्पष्ट झालेले न्हवते. हल्ला वयक्तिक वैमनस्यातून किंवा आर्थिक व्यवहारातून झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठण्यात अज्ञात विरोधात संगनमत करून जीवघेण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.मात्र जखमी छाजेड कुटुंबियांचे आज दुपारी जबाब नोंदविल्या नंतर घडलेल्या प्रकारा बाबत अधिक माहिती मिळेल. त्या दिशेने तपास करण्यात येईल अशी माहिती जिन्सी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शरद जोगदंड यांनी दिली आहे.
हल्ल्याने उद्योजकामध्ये दहशत
जलनारोड लगत असलेल्या सुधाकरनगर या उच्चभ्रू वसाहती मध्ये बहुतांश उद्योजक,व्यापारी राहत आहेत. कालच्या घटनेमुळे अनेक तर्क वितर्कांना उधाण आले असून हा हल्ला खंडणी किंवा आर्थिक व्यवहारातून तर झाले नाही ना? अशी चर्चा सुरू असून उद्योजकांच्या परिवरामध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे.या परिसरात कायमस्वरूपी पोलिसांची रात्रगस्त ठेवण्यात यावी अशी मागणी होत आहे.