पुढच्या वर्षी लवकर या..च्या जयघोषात गणरायाला निरोप

Foto
गणपती बाप्पा मोरया...

▶ कायगाव टोका येथील श्रीक्षेत्र रामेश्वर मंदिराच्या परिसरात भाविकांची गर्दी
▶ ढोल - ताशांच्या गजरात अनंत चतुर्दशीची सांगता, नागरिकांची मोठी उपस्थिती

गंगापूर, (प्रतिनिधी) गणरायाच्च्या आगमनाने बारा दिवसांपासून भक्तीमय झालेल्या वातावरणाला अनंत चतुर्दशीला भावपूर्ण निरोपाची किनार लाभली. दररोजच्या आरती, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे निर्माण झालेल्या एकीच्या आणि सलोख्याच्या वातावरणानांतर गणेशभक्तांनी जड अंतःकरणाने लाडक्या बाप्पाला निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोषाने कायगाव टोका परिसर दुमदुमून गेला.

छत्रपती संभाजीनगर तसेच अहिल्यानगर जिल्हातील गणेशभक्तांनी कायगाव टोक येथील गोदावरी नदीकाठच्या श्रीक्षेत्र रामेश्वर मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. सकाळी १० वाजल्यापासून विविध गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या. गंगापूर, कायगाव, भेंडाळा, जामगाव, मांजरी, छत्रपती संभाजीनगर, वाळूज, शे. राजणगाव, तुकाबाद तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा, घोडेगाव, खुपटी, वडाळा आदी भागांतील गणेश मंडळांनी विसर्जनासाठी सहभाग घेतला.

गंगापूर, (प्रतिनिधी) : मिरवणुकीत ढोल ताशांचा गजर, रणहलगीचा कडकडाट, बेंजोच्या तालावर थिरकणारी पावले, आकर्षक विद्युत रोषणाई आणि रंगीबेरंगी लेसर किरणांमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गुलालाने माखलेले चेहरे आणि भक्तीच्या तालावर नाचणाऱ्या गणेशभक्तांनी मिरवणुकीत रंगत आणली. मात्र, यंदा डीजे व डॉल्बीवरील निर्बंधामुळे पारंपरिक ढोल ताशांना अधिक प्राधान्य मिळाल्याचे दिसून आले, त्यामुळे अबालवृद्धांसह महिला आणि बालगोपालांचाही मिरवणुकीतील सहभाग वाढला.

-- होडीतून लहान मूर्ती, क्रेनने मोठ्या मूर्तीचे विसर्जन ----
श्रीक्षेत्र रामेश्वर मंदिर परिसरात लहान गणेशमूर्ती जमा करून त्या होडीच्या सहाय्याने गोदावरी नदीच्या पात्रात नेऊन विसर्जित करण्यात आल्या. मोठ्या गणेशमूर्तीचे विसर्जन क्रेनच्या सहाय्याने करण्यात आले. घरगुती गणेशमूर्तीचेही अनेक भाविकांनी विधिवत विसर्जन केले.

विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस अधीक्षक
प्रमोद जाधव, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी जान्हवी शेखर, सूर्यकांत कोकणे, पोलीस निरीक्षक सलीम चानुस, सायबर सेलचे पो. नि. कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक पाटील, पोलीस उपनिरीक्षक मधुकर मोरे, विश्वनाथ फरताडे, होमगार्ड समादेशक अधिकारी चंदशेखर पाटील, पोहेका मनोज नवले, विहुल जाधव, अमोल सोनवणे, भागवत खाडे, विजय पाखरे, मनोज घोडके, रिजवान शेख, दत्तात्रय अवधूत आर्दीनी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली.

कायगाव टोक येथील गोदावरी नदी परिसरात मूर्ती विसर्जनासाठी प्रशासनाकडून आवश्यक व्यवस्था केली होती. निर्माल्य नदीपात्रात टाकु नये, यासाठी फलक लावून निर्माल्य संकलनाची व्यवस्था तहसील कार्नाल्लाच्या वतीने करण्यवा आली होती. प्रशिशणार्थी उपविभागीय अधिकारी अविनाश कोल्डे, तहसीलदार नवनाथ वगवाड, नायब तहसीलदार सचिन बाघमारे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे, कार्यातलं प्रमुख स्वप्नील रंगाने व कर्मचली तसेच मंडळ अधिकारी आणि तलाठी ब्रिजेश पारये यांच्यासह अधिकारी-कर्मचारी दिवसभर परिसरात तळ ठोकून होते.

-- दिवसभर उत्साहात सुरू असलेल्या विसर्जन -- 
मिखणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणांनी परिसर भारावून गेला होता. बारा दिवसांचा पाहुणचार संपवत लाडक्या गणरायाला निरोप देताना बालगोपालांसह प्रत्येक गणेशभक्तांचे अंतःकरण मात्र गहिवरून आले होते.