चुली पेटवून शेतमजुरांचे आंदोलन

Foto
सागर प्रकाशनचे
साजवार्ता
Page No.: 3
Date: 05/11/2026
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शेतमजूर, गायरान धारकांनाही दुष्काळी मदत द्यावी या प्रमुख मागणीसाठी लाल बावटा शेतमजूर युनियनतर्फे बुधवारी (दि.४) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भर रस्त्यावर चुली मांडून आंदोलन करण्यात आले. दुपारचे त्याठिकाणीच स्वयंपाक बनवून जेवण करण्यात आले. रात्रीही चुली पेटवून तिथेच जेवण करण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली होती. दुष्काळग्रस्त तालुक्यातील सर्व गावातील गायरानधारक, शेतमजूर व ग्रामीण कष्टकऱ्यांना
मदतीसोबतच ग्रामीण कष्टकरी, शेतमजुरांसाठी रोजगार हमीची व दुष्काळी कामे काढावीत, गायरान जमिनीच्या पट्ट्याची मालकी द्यावी घरकुलाची प्रलंबित प्रकरणे निकालात काढावीत, मायक्रो फायनान्सचा
विळखा थांबवावा, सक्तीची कर्ज वसुली करणाऱ्यांना अटक करावी आदी मागण्या करण्यात आल्या. सोयगाव, गंगापूर, सिल्लोड, फुलंब्री, पैठण या तालुक्यातील सुमारे ३०० ग्रामीण कष्टकरी यात सहभागी झाले होते.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions