सिल्लोड, (प्रतिनिधी) : सततची नापिकी आणि बँकांचे कर्ज यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना वडोद चाथा (ता. सिल्लोड) येथे शनिवारी, चार एप्रिल रोजी घडली. गजानन साळवे असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. घटनेची सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
या वडोद चाथा येथील शेतकरी गजानन विठ्ठल साळवे (वय ४८) हे मागील काही दिवसांपासूनआपल्या शेतातील नापिकीमुळे त्रस्त झाले होते. या दरम्यान शेतीसाठी घेतलेले बँकांचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ते होते. शनिवारी
दुपारच्या सुमारास आपल्या स्वतःच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लाऊन घेतला. ही घटना आजूबाजूच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आली. त्यांचे नातेवाईक ज्ञानेश्वर साळवे यांनी त्यांना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची सिल्लोड ठाण्यात ग्रामीण पोलिस आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास बिट जमादार रामेश्वर जाधव हे करीत आहे.














