छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो): तालुक्यातील करमाड परिसरात रब्बी हंगामातील गहू पिकांच्या काढणीसाठी शेतकऱ्यांची सध्या धावपळ सुरू झाली आहे. मागच्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पिके अक्षरशः भुईसपाट झाली आहेत.
३० मार्चपासून पुन्हा पावसाचा अंदाज हवामान खात्याने तातडीने काढणीस सुरुवात करत आहेत. वर्तविल्यामुळे उरलेल्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी काही ठिकाणी हार्वेस्टरच्या माध्यमातून गहू काढणी केली जात असून यासाठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे. यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी अत्यंत हार्वेस्टर चालकाची मनधरणी दरम्यान, एकाचवेळी अनेक शेतकऱ्यांकडून काढणीची कामे सुरू असल्याने मजूर टंचाई जाणवत आहे.
त्यामुळे काही शेतकरी हार्वे स्टरचा पर्याय निवडत आहेत. मात्र, सध्या परिसरात हार्वेस्टरची मागणी वाढल्याने हार्वेस्ट चालकांची मनधरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. नुकसानकारक ठरत आहे. खरीप हंगामातही अतिवृष्टीमुळे कपाशी व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. नव्या उमेदीने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू पिकाची पेरणी केली.
मागच्या पावसाळ्यात मुबलक पाणीसाठा झाल्याने ७० टक्के शेतकऱ्यांनी गव्हाची लागवड केली होती. हे पीक काढणीच्या टप्प्यात आले असतानाच अवकाळी पावसाने पुन्हा मोठा फटका दिला आहे. गेल्या आठवड्यातील वादळी पावसामुळे गहू पिके मोठ्या प्रमाणावर आडवी झाली असून उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नैसर्गिक आपत्तींच्या सततच्या मालिकेमुळे शेतकरी हवालदिल झाला असून आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे.












