शेतकऱ्यांना मिळणार कॅनमध्ये डिझेल !

Foto
पुरवठा विभागाचे पेट्रोल पंप चालकांना आदेश

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): जिल्ह्यात डिझेलचा पुरवठा विस्कळित झाला. पेट्रोल पंपांवर कॅनमध्ये पेट्रोल डिझेल देण्यावर बीपीसीएल कंपनीने निर्बंध आणले होते. यामुळे शेतीकामासाठी डिझेलवर अवलंबून असलेल्या शेतकन्यांची मोठी गैरसोय होत होती. जिल्हा पुरवठा विभागाने हस्तक्षेप करत शेतकऱ्यांची अडवणूक करू नये आणि त्यांना कॅनमध्ये डिझेल द्यावे, असे आदेश पेट्रोल पंप चालकांना दिले. शेतीपंप, ट्रैक्टर, जनरेटर आणि इतर कृषी यंत्रांसाठी डिझेलची आवश्यकता आहे. पण, काही दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात डिझेल पुरवठ्यावर परिणाम झाला.

काही पेट्रोल पंपांवर डिझेलचा साठा लवकर संपत असल्याने कॅलमध्ये इंधन देण्यावर अनौपचारिक निबंध आणण्यात आले होते. बीपीसीएल कंपनीने पंपचालकांना कॅनमध्ये पेट्रोल डिझेल वाटप टाळण्याच्या सूचना दिल्या होत्या. यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या  शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत होते. पेरणीपूर्व मशागत, मोटारपंप आणि शेती उपकरणांसाठी डिझेलची गरज वाढत असताना अचानक घालण्यात आलेल्या या निबंधामुळे शेतकरी संतप्त झाले होते. शेतकऱ्यांकडून वाढत्या तक्रारीनंतर पुरवठा विभागाने परिस्थितीची दखल घेत 


एमआयडीसीतील पंपांना वाढीव पुरवठा : पेट्रोल, डिझेल टंचाईचा फटका उद्योगालाही बसत आहे. इंधनाअभावी
अनेक मोठी वाहनांची चाके थांबली असून औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या (एमआयडीसी) १० पेट्रोल पंपांना वाढीव इंधन पुरवठा करावा, अशी मागणी उद्योजकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. चिकलठाणासह शेंद्रा, वाळूज बजाजनगर, शेंद्रा बिडकीन औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत. या उद्योगांना आता इंधन टंचाईचा सामना करावा लागत असून उद्योगांना मोठा बसत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

 निवेदनुसार याअगोदर नोटा बंदीचा फटका उद्योगांना बसला, या मानवनिर्मित संकटातून उद्योजक सावरत असतानाच कोरोना या महामारीने सगळ्यांनाच कवेत घेतले. याला उद्योग क्षेत्र अपवाद कसे असणार? या दोन्ही संकटांतून उद्योग उभारी घेत असतानाच गॅस टंचाईला सामोरे जावे लागले. तीव्र गॅस टंचाईमुळे उद्योजकांना आपले काही कारखाने बंद करावे लागले, अशा एकामागून एक येत असलेल्या संकटांचा सामना करत आपला उद्योग वाढीसाठी प्रयत्नशील असलेल्या उद्योजकांना आता आखातातील युध्दामुळे इंधन टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

शासनाच्या आदेशानुसार कृषी कामांसाठी आवश्यक असलेले डिझेल शेतकऱ्यांना नाकारणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी पेट्रोल पंप चालकांना शेतकऱ्यांची अडवणूक करू नये
कंपनीला देण्यात आली. आणि आवश्यक त्या प्रमाणात कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना दिल्या. गैरवापर होऊ नये यासाठी शेतकरी असल्याची पडताळणी करूनच डिझेल देण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.

शासनाने शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून देण्याची सूचना केली. मात्र, काही पंपावर कॅनमध्ये डिझेल देण्यास टाळाटाळ केली जात होती. कंपनीला तसे करता येणार नाही. शेतकऱ्यांची अडवणूक करू नका, असे स्पष्ट आदेश देण्यात आले. त्यामुळे आता शेतकन्यांना कोणतीच अडचण येणार नाही.
- प्रवीण फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी.