पैठणमध्ये शेतकऱ्यांचे भीक मांगो आंदोलन

Foto
पैठण (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने ज्ञानेश्वर माऊली मुळे
यांच्या नेतृत्वाखाली पैठण शहरात भीक मांगो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले होते. 

सचिन घायाळ शुगर लिमिटेड संचलित श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याकडे थकीत असलेले शेतकऱ्यांचे ऊस बिलाची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावी, पिक विमाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. 

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशा विविध मागण्यासाठी शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने आज सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान पैठण शहरात भीक मांगो आंदोलन करण्यात आले शासनाकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नसल्याने या आंदोलनातून जमा झालेली रक्कम शासनाला देण्यात येणार असल्याचे स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली मुळे यांनी सांगितले. 

या भीक मांगो आंदोलनास छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली आंदोलन करताना प्रत्येक दुकानात जाऊन भीक मागितली. या आंदोलनात अर्धा नग्न अवस्थेत शेतकरी रस्त्यावर उतरले होते.