सिल्लोड, (प्रतिनिधी) : भराडी सर्कलमधील व पंचायत कृषीतील शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या प्रमुख समस्या व अनेक गावांमध्ये सिंगल फ्युज व रोहित्र बसने शेतकऱ्याचे मोडलेले पोल नवीन टाकण्यात यावे लटकलेले तार सरळ करणे तसेच शेतकऱ्यांना दिवसा लाईट देणे अशा अनेक समस्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यासमोर समस्या मांडल्या बैठकीसाठी शेतकऱ्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.
कार्यालयाचे या बैठकीसाठी महावितरण उपकार्यकारी अभियंता श्री प्रदीप काळे साहेबांची उपस्थिती होती व अभियंता सहाय्यक शाखा भराडी श्री मनोज सोनवणे व संपूर्ण लाईनमन यांची पण उपस्थिती होती सर्व शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून अभियंता साहेबांनी एका महिन्याच्या आत कामी मार्गे लावण्यात येतील असे लेखी स्वरूपात असे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य राधाकृष्ण माधराव काकडे, पंचायत समिती सदस्य नारायण शिवाजी खोमणे भराडीचे माजी सरपंच रघुनाथ पांडव, गणेश राकडे माजी सरपंच कासोद, पंढरीनाथ चाथे माझी सरपंच वडोद चाथा, संतोष भाऊ पुंगळे, काकासाहेब चाथे गजानन भाऊ, दादाराव पांढरे संतोष काकडे, विजू काकडे, पवन भागवत, प्रकाश माहूर काकासाहेब महाकाळ, संजय काकडे, भगवान काकडे भागवत काकडे, साहेबराव खोमणे, सुरेश शेळके, गोविंद शेळके, गणेश शिरसाट, पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.













