फुलंब्रीमध्ये तलाठ्यावर वाळू माफियांचा जीवघेणा चाकूहल्ला

Foto
फुलंब्री, (प्रतिनिधी) : अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करत असताना तलाठ्यावर वाळूमाफियांनी चाकूने जीवघेणा हल्ला चढवला, शिवाय त्यांच्या सहकाऱ्यांनाही जबर मारहाण केली. बुधवारी (दि.१) मध्यरात्री ही खळबळजनक घडली.

फिर्यादी तलाठी कडूबा रामभाऊ तुपे (वय ५७, रा. श्रेयनगर हडपसर, छत्रपती संभाजीनगर) हे फुलंब्री तालुक्यातील वावना तलाठी म्हणून कार्यरत आहेत. ते १ एप्रिलच्या मध्यरात्री शासकीय वाहनाने (एमएच २०, ईजे ०१२४) अवैध बाळू वाहतुकी विरोधात कारवाईसाठी निघाले होते. यावेळी त्यांच्या सोबत सहकारी ग्राममहसूल अधिकारी भगवान सांडू डोरमारे, सतीश रामराव हराळ, महसूल सेवक कारभारी कचरू कवळे हे सोबत होते. यावेळी त्यांना फुलंब्री कान्होरी मार्गावर आमीना मशीद खाजा अली दर्गा पुलाजवळ वाळू वाहतूक सुरू असल्याचे दिसून आले.
यावेळी तलाठी कचरू तुपे यांनी संशयितांना विचारणा केली असता आरोपी राजू शहा, सोहेल शहा, साजिद उर्फ गुड्डू शेख व इतर पाच जणांनी आक्रमक भूमिका घेत सहकाऱ्यांशी वाद घातला. काही क्षणातच या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले.

तलाठी व त्यांच्या ८ आरोपींवर गुन्हा दाखल
आठ आरोपींवर दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना संभाजीनगर येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात राजू शहा, सोहेल शहर, साजिद उर्फ गुडू शेख यांच्यासह इतर पाच अज्ञात आरोपीविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपींनी प्रथम तलाठी तुपे यांना टार्गे ट करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. याचवेळी एका आरोपीने चाकूने हल्ला करत त्यांच्या डाव्या डोळ्याखाली गंभीर जखम केली. या हल्ल्यात तलाठी तुपे गंभीर जखमी होऊन खाली कोसळले. दरम्यान त्यांच्या सहकाऱ्यांनी मध्यस्ती करत वाळूमाफियांच्या तावडीतून तलाठी तुपे यांची सुटका केली. जखमी अवस्थेत तलाठी तुपे यांना तातडीने रुग्णालयात सहकाऱ्यांनाही मारहाण.