गंगापूर, (प्रतिनिधी): शेताचा बांध नांगरून अतिक्रमण केल्याची विचारणा केल्याच्या रागातून चुलत्याने व त्याच्या मुलांनी वडील व मुलाला काठीने मारहाण करत जी मारण्याची धमकी दिली.
कायगाव (ता. गंगापूर) येथे मंगळवारी (ता. २१) ही घटना घडली. विठ्ठल महादेव कहाणे (३२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे काका यादव कहाणे व चुलत भाऊ बालकृष्ण कहाणे यांनी शेत गट क्र. १६९ मधील सामायिक बांध
नांगरून टाकला होता.
विठ्ठल व त्यांचे वडील महादेव या याबाबत विचारणा केली असता, संशयित आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत का मारहाण केली. ज्ञानेश्वर व दत्तू कहाणे यांनी महादेव यांना लाथाबुक्क्यांनी मारहा करून शेतात पाय ठेवल्यास जीवे मारू, अशी धमकी दिली. याप्रकरणी गंगापू पोलिसांनी यादव, बालकृष्ण, ज्ञानेश्वर आणि दत्तू कहाणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.














