शेतकऱ्याचा कोयत्याने खून करणाऱ्या बाप-लेकास जन्मठेपेची शिक्षा

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): चौधरी गावणी (ता. सोयगाव) येथे शेतातून घरी परतणाऱ्या दांपत्याला रस्त्यात अडवून आरोपी बाप-लेकाने त्यांच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. खून करणारे आरोपी ज्ञानेश्वर रामदास चौधरी (५०) आणि हेमंत ज्ञानेश्वर चौधरी
(२१, दोघे रा. सोयगाव) या दोघांना जन्मठेप व प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. खेडेकर यांनी ठोठावली.
मनीषा सुनील चौधरी (३४, रा. चौधरी गावणी, ता. सोयगाव) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार फिर्यादी व त्यांचे पती सुनील चौधरी हे १७ जुलै २०२१ रोजी सायंकाळी शेतातील काम
आटोपून दुचाकीने घरी परतत होते. त्या वेळी ज्ञानेश्वर चौधरी व त्याचा मुलगा हेमंत यांनी त्यांना अडवले. जुन्या भांडणाच्या कारणावरून हल्ला चढवला. आरोपीने कोयत्याने सुनील चौधरी यांच्या डोक्यावर वार केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणात सोयगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions