लेकासाठी बाप गेला पोलिसांच्या अंगावर धावून वृद्ध ऑम्लेट चालकाला लुटले

Foto

छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो): रामनगर येथील एका वृद्ध हातगाडी चालकाकडे ऑम्लेटचे पैसे मागितल्याच्या कारणावरून चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगार मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या बापाने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात राडा घातला. मुलावर गुन्हा दाखल करू नये म्हणून या बापाने थेट पोलीस अंमलदार आणि पोलीस निरीक्षकांच्या अंगावर धावून जात त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. २२) रात्री ८ ते १० वाजेदरम्यान घडला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी दोघा गुन्हेगार बाप-लेकावर स्वतंत्र गुन्हे दाखल करून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

रवींद्र लहानू केदारे (रा. संजयनगर, गल्ली नं. २१, मुकुंदवाडी) असे पोलीस ठाण्यात धुमाकूळ घालणाऱ्या बापाचे नाव आहे, तर धीरज - रवींद्र केदारे असे लूटमार करणाऱ्या मुलाचे नाव आहे. सध्या न्यायालयाने आरोपी मुलाला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, बापाची हसूल कारागृहात रवानगी केली आहे.

▶ फिर्यादी कन्हैयालाल बाबुलाल लिधोरिये (वय ६२, रा. सावित्रीनगर, चिकलठाणा) यांची रामनगर भागात ऑम्लेटची हातगाडी आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास आरोपी धीरज केदारे याने तेथे ऑम्लेट खाल्ले. लिधोरिये यांनी पैशांची मागणी केली असता त्याने वाद घालत अंडी फेकून नासधूस केली. तसेच चाकूचा धाक दाखवून गल्ल्यातील २ हजार रुपये लुटून नेले. लिधोरिये यांनी तात्काळ मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार दिल्यानंतर कारवाई करण्यात आली.

घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions