आर्यानंदी कॉलनीत निर्वाण लाडू महोत्सव साजरा

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : श्रावण शुक्ल सप्तमीनिमित्त भगवान पार्श्वनाथ यांचा मोक्ष कल्याणक दिवस आर्यानंदी कॉलनी येथे भक्तिभावाने साजरा करण्यात आला. सकाळी भगवंताचा अभिषेक केला. निर्वाण कांड वाचून कुंमकुमदेवी पापडीवाल परीवार व उपस्थित त्यानंतर भाविकांच्या वतीने लाडू चढवला. वर्षायोगासाठी विराजमान सिद्धांत चक्रवर्ती आचार्य श्री १०८ हेमसागरजी महाराज यांच्या सान्निध्यात धार्मिक कार्यक्रम व प्रवचन झाले.
आचार्यश्रींनी पार्श्वनाथांच्या भगवान जीवनातील करुणा, अहिंसा, तपश्चर्या आणि
उपसर्गांवरील विजयाचे वर्णन केले. नाग-नागिणीचा प्रसंग सांगताना त्यांनी जीवमात्राप्रती करुणा व अहिंसेचा संदेश दिला. तसेच कमठाने केलेल्या उपसर्गावेळी भगवान पार्श्वनाथांनी दाखविलेली समता आणि धरणेन्द्र देव व माता पद्मावती यांनी
केलेले संरक्षण याविषयी मार्गदर्शन केले. यक्ष-यक्षींबाबत धार्मिक मर्यादा स्पष्ट करताना त्यांचा आदर करावा, असे आचार्यश्रींनी सांगितले. कर्मांची निर्जरा, समता, अहिंसा व करुणेचा मार्ग स्वीकारून मोक्षमार्गावर वाटचाल करण्याचे आवाहन त्यांनी केले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions