छत्रपती संभाजीनगरात फिल्मी दांडियाची धूम, २७ ते २९ सप्टेंबरला आयोजन

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): नवरात्रीत छत्रपती संभाजीनगरकरांसाठी खास आकर्षण असणार आहे. फिल्मी दांडिया २०२५ चे.फिल्मी दांडिया २७ ते २९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सागर रिसॉर्ट येथे सोहळा रंगणार आहे. संगीत, नृत्य आणि भक्तीचा अनोखा संगम अनुभवता येणार आहे.

दांडियाचे विशेष आकर्षण म्हणजे इन्स्टाग्रामवरील लोकप्रिय इन्फ्लुएंसर डॅनी पंडित यांची खास उपस्थित राहणार आहे.  पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी पुरुष व महिला बाऊन्सर्स, आकर्षक लाईटिंग व साऊंड सिस्टम, उत्तम संगीत आणि उत्तम व्यवस्थापनाची हमी आयोजकांनी दिली आहे. याशिवाय प्रेक्षकांसाठी आकर्षक गिफ्ट्स, सरप्राईजेस व लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पहिल्या दिवशी महिलांसाठी प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे. महिलांसाठी हा आनंदाचा सोहळा अधिक खास ठरणार आहे. 

पावसामुळे कार्यक्रमात व्यत्यय येऊ नये म्हणून आयोजकांनी कव्हर केलेल्या जागेची व्यवस्था केली आहे, ज्यामुळे दांडियाचा उत्साह थांबणार नाही. सर्व पाहुण्यांसाठी फूड स्टॉल्सची आणि पाण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. फिल्मी दांडिया २०२५ हा नवरात्रीचा उत्सव पारंपरिक भक्तीभाव व फिल्मी ग्लॅमरचा संगम घडवून आणणार आहे. त्यामुळे शहरातील हा एक अविस्मरणीय सोहळा ठरेल. जास्तीत जास्त संख्येने यात सहभागी व्हावे. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.