गावात कर्मचारी वेळेवर येत नव्हते म्हणून उचलले पाऊल
छत्रपती संबाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) : बोडखा हे गाव डोंगराळ भागात येत असून या गावांमध्ये ४० सरकारी कर्मचारी नोकरी करतात परंतु हे गाव खुलताबाद तालुक्याच्या शेवटच्या टोकाची गाव असल्याने या गावात कर्मचारी वेळेवर येत नव्हते व गावकऱ्यांची कामे वेळेवर होत नव्हते.
त्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच म्हणून अशोक जाधव यांनी २०२२ ला बोडखा ग्रामपंचायत मध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पहिलीच ग्रामपंचायत मध्ये थम मशीन बसविले.
संघर्षमय जीवन जगत स्वतः च्या कर्तुत्वाने यशाचे शिखर गाठणारे व खुलताबाद तालुक्यातील बोडखा येथील
सरपंच अशोक सांडू जाधव यांचा राजकीय प्रवास वीस वर्षापासून सुरूच आहे. बोडखा गावात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये दोन वेळेस भाग घेऊन तालुक्यातून एक वेळेस प्रथम क्रमांकाचे व दुसरे वेळेस द्वितीय क्रमांकाचे गोडखा गावात बक्षीस मिळवून दिले.
त्यांच्या सरपंच कार्यकाळात बोडखा गावात सात पाझर तलाव, आठवड्या बाजार भरवण्यास सुरुवात केली. बोडखा गावात गंदेश्वर धरणातून नवीन वीर नवीन पाईपलाईन नवीन पाण्याची टाकी १ कोटी ११ लाख रुपयाची योजना राबवून बोडखा गावास पाणीटंचाई मुक्त गाव केले. बोडखा गावात सिमेंट रोड, स्मशानभूमी शेड नवीन तीन अंगणवाडी सुरू करून नवीन इमारती बांधल्या. बोडखा येथील मुस्लिम कब्रस्तानास संरक्षण भिंत बांधली बोडखा येथे उर्दूची पहिली ते आठवीपर्यंत उर्दू शाळा सुरू केली.
बोडखा येथे नवीन शाळेच्या सहा रूम बांधल्या बोडखा येथील जुनी शाळेची इमारत पाडून त्या जागी दोन मजली मराठी माध्यमाची शाळेसाठी मंजुरी आणली बोडखा येथील नंबर दोन झोपडपट्टीवर पिण्याच्या पाण्यासाठी बोर घेतला बोडखा येथे मंगल कार्यालय बांधण्याची परवानगी आणली.











