साजवार्ता
Dage N1/11/2026
पाण्याचा जोरदार मारा करीत अग्निशमन पथकाकडून आगीवर नियंत्रण
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शरणापूर फाट्याजवळ असलेल्या लाकडाच्या कारखान्याला रात्री अचानक आग लागल्याची घटना घडली. रात्रीच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. लाकडाचा कारखाना असल्याने आगीने रौद्ररूप धारण करण्याची शक्यता होती. घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्रातील पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्याचा जोरदार मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग विझविण्यात यश आले.
शरणापूर फाट्याजवळील एका लाकडाच्या कारखान्याला सोमवारी रात्री
९ वाजून २१ मिनिटांच्या सुमारास आग लागली. कारखान्यात लाकूड आणि इतर साहित्य असल्याने आगीची तीव्रता वाढण्याची शक्यता होती. यावेळी शेख यांनी मुख्य अग्निशमन केंद्राच्या नियंत्रण कक्षाला आगीची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन केंद्रातील अधिकारी आणि जवानांनी विलंब न करता घटनास्थळ गाठले.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर जवानांनी तातडीने आग विझविण्याच्या कामाला सुरुवात केली. यासाठी एक अग्निशमन बंब तैनात करण्यात आला होता. आगीच्या दिशेने पाण्याचा मारा करण्यात आला. आग पसरू नये, यासाठी जवानांनी विशेष खबरदारी घेत
जवानांची तत्परता
रात्रीच्या वेळी आगीची घटना घडल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अग्निशमन दलाला मिळालेली तातडीची माहिती आणि जवानांनी दाखविलेली तत्परता यामुळे आग आटोक्यात आणणे शक्य झाले. या घटनेत किती नुकसान झाले, तसेच आग लागण्याचे नेमके कारण काय, याबाबत अद्याप कारण स्पष्ट झाले नाही.
नियोजनबद्ध पद्धतीने आग विझविण्याचे काम केले. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही आग विझविण्याची मोहीम राबविण्यात आली. अग्निशमन केंद्र अधिकारी विजय राठोड, उप अग्निशमन केंद्र अधिकारी एल. पी.
कोल्हे आणि ड्युटी अधिकारी डी. आर. गंगावणे यांनी घटनास्थळी मोहिमेचे नियोजन केले. अग्निशामक जवान संग्राम मोरे, सचिन शिंदे, रवी दुधे आणि सचिन फुले यांनी आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले. तर अग्निशमन बंबाचे चालक संतोष चव्हाण यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














