रब्बीचे पहिले आवर्तन २० नोव्हेंबरपासून

Foto
गरजेनुसार अतिरिक्त पाण्याचे नियोजन : जलसंपदा मंत्री विखे पाटील यांची माहिती
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : नांदूर मधमेश्वर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामात दोन आणि उन्हाळी हंगामात एक, अशी एकूण तीन आवर्तने सोडण्याचे
नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. रब्बीचे पहिले आवर्तन २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान सोडण्यात येणार असून, शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष गरजेनुसार वाढीव पाणी उपलब्ध करून दिले जाईल. तसेच जानेवारी
महिन्यात एकूण उपलब्ध पाणीसाठ्याचा पुनराढावा घेऊन अतिरिक्त आवर्तनाबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांनी सोमवारी (दि. २) दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ. विखे यांच्या अध्यक्षतेखाली नांदूर मधमेश्वर प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीला आ. प्रशांत बंब, रमेश बोरनारे, विठ्ठलराव लंघे, पदवीधर
दोन टीएमसीपर्यंत वाढवण्याची मागणी
बैठकीत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पातील पाण्याची उपलब्धता, विविध धरणांतील साठा, मंजूर आरक्षण आणि प्रस्तावित आवर्तनांचे सादरीकरण केले. त्यानुसार रब्बी हंगामातील पहिले आवर्तन २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या कालावधीत एक टीएमसी, तर दुसरे आवर्तन १९ फेब्रुवारी ते १२ मार्च २०२७ या कालावधीत १.३५५ टीएमसी पाण्याचे प्रस्तावित आहे. उन्हाळी हंगामासाठी २० एप्रिल ते १ मे २०२७ या कालावधीत एक आवर्तन प्रस्तावित केले. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या आवर्तनासाठी प्रस्तावित एक टीएमसी पाणी अपुरे पडू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांची सिंचनाची गरज लक्षात घेऊन हे आवर्तन दोन टीएमसीपर्यंत वाढविण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली. त्यावर डॉ. विखे पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत प्रत्यक्ष आवश्यकता, उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन वाढीव पाणी देण्याचे नियोजनाचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
आमदार प्रतापसिंह पाटील, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत गवळी,
जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions