मच्छिमारांनी राष्ट्रीय मत्स्य व्यवसाय डिजिटल प्लॉटफार्म अंतर्गत नोंदणी करून शासनाच्या विविध योजनाचा लाभ घ्यावा : आ.विलास भूमरे

Foto
पैठण, (प्रतिनिधी) :   गोदावरी नदी, नाथ सागर जलाशय आणि परिसरातील जलस्रोतांवर अवलंबून असलेल्या पैठणसह परिसरातील मच्छीमार बांधवांना राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच नाथ सागर जलाशयात मत्स्यबीज सोडण्यात येणार असल्याची ग्वाही आ.विलास भुमरे यांनी दिली.

राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्मअंतर्गत मच्छीमारांची ऑनलाइन नोंदणी करून त्यांना शासनाच्या विविध योजनांशी जोडण्यासाठी पैठण येथे आयोजित विशेष नोंदणी शिबिरात ते बोलत होते.यावेळी जायकवाडी पक्षी अभयारण्य व मच्छीमार बचाव समितीचे अध्यक्ष बजरंग लिंबोरे, माजी  नगरसेवक भूषण कावसानकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील,नगरसेवक जितु परदेशी,फाजलभाई टेकडी, यांच्यासह मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्त मधुरिका जाधव,माजी नगराध्यक्ष  सोमनाथ  परदेशी, राजू गायकवाड,रमेश वीर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रास्ताविकात नगरसेवक बजरंग लिंबोरे यांनी मच्छीमारांच्या विविध समस्या मांडल्या. शासनाच्या योजनांची माहिती आणि त्यांचा लाभ मिळवताना मच्छीमारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, डिजिटल नोंदणीच्या माध्यमातून मच्छीमारांना शासकीय योजनांच्या प्रवाहात आणण्याचा मार्ग मोकळा होणार असून, यापुढे ते योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना आमदार भुमरे म्हणाले की, राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्मअंतर्गत नोंदणीमुळे मच्छीमारांची माहिती शासनाच्या डिजिटल प्रणालीमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मत्स्यव्यवसायासाठी आर्थिक सहाय्य, व्यवसायवाढ, आधुनिक उपकरणे, मत्स्यपालन सुविधा,प्रशिक्षण तसेच अन्य शासकीय योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया सुलभ होईल. पात्र मच्छीमारांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील. त्यामुळे प्रत्येक मच्छीमाराने या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले, नाथ सागर जलाशयात मच्छीमार मासेमारीसाठी परवानगी देण्यात यावी यासाठी येणार्या अधिवेशनात प्रश्न मांडण्यात येईल, असे आमदार भुमरे यांनी यावेळी सांगितले.

 नाथसागर  जलाशयावर अवलंबून असणारे मत्स्यव्यवसायला नव्याने बळ देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार भुमरे यांनी स्पष्ट केले. यावेळी रमेश लिंबोरे,भगवान घटे, रघुनाथ इच्छीया,कैलास बनगया, बाळू घटे, अनिल लिंबोरे ,राजेश लिंबोरे,गोरखनाथ घटे,धोंडीराम लिंबोरे, मोरे,संजय लिंबोरे,बजरंग गव्हाणे,दिपक पल्हारे,विठ्ठल लिंबोरे,विजय पल्हारे यांच्या सह कहार समाजातील महिला व मोठ्या संख्येने मच्छीमार बांधव उपस्थित होते.