साडेपाच हजार कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

Foto
छत्रपती संभाजीनगर, राज्यातील (सांजवार्ता ब्युरो) शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून (दि.२१) राज्यव्यापी संप पुकारला आहे. यात संभाजीनगर शहर, जिल्ह्यासह मराठवाड्यातील कर्मचारी सहभागी झाले. प्राप्त आकडेवारीनुसार, संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत ८३५ तर मराठवाड्यातील एकूण ५ हजार ६२० कर्मचारी गैरहजर होते. यामुळे महसुली कामांवर मोठा परिणाम झाल्याचे चित्र होते.
राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेअंतर्गत राज्यातील १७लाख कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. बहुतेक सर्वच कर्मचारी
संपत सहभागी झाल्याने बऱ्याच कार्यालयातील कामकाजावर परिणाम दिसून आला.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर
सर्व ग्राम महसूल अधिकारी, मंडळ तलाठी संघाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे संपात सहभागी होणार असल्याचे कळवले होते. जिल्ह्यातील
कामकाजावर परिणाम
प्रशासनाकडून प्राप्त आकडेवारीनुसार, येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील १०१२ पैकी ८३५ कर्मचारी तर विभागीय आयुक्तालयातील १५६ पैकी १७ कर्मचारी संपात सहभागी झाले होते. यासोबतच विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये मिळून एकूण ७ हजार ६६ पैकी ५ हजार ५२० कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला. यामुळे कामकाजावर परिणाम दिसून आला.
अधिकारी हे सहभागी झाल्याने सुनावण्या थांबल्या होत्या. ग्रामीण भागात कामकाज ठप्प झाले होते. संभाजीनगरमधील नोंदणी विभागातील सर्वच कर्मचारी संपात गेले असल्याने एकही काम झाले
नसल्याचे सह जिल्हा निबंधक विवेक गांगुर्डे यांनी सांगितले. सध्या शेतीची कामे सुरु असल्याने प्रशासनाकडे शेतकऱ्यांची कामे असतात. त्या कामांवरही परिणामी दिसून आला.