आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथके परराज्यात दाखल प्रतापनगर सशस्त्र दरोडा प्रकरण

Foto
सीसीटीव्ही फुटेज तपासणी
44 दरोडेखोरांनी गुन्ह्यासाठी रेल्वेचा वापर केल्याचा संशय असल्याने आणि त्यांनी घरातून रेल्वे रुळाच्या दिशेनेच पलायन केल्याने पोलिसांनी प्रतापनगर परिसरासह रेल्वेस्टेशन आणि शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सीसीटीव्ही फुटेजसह मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासावर सध्या पोलिसांकडून भर दिला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो) : प्रतापनगर या उच्चभ्रू वस्तीत एका व्यापाऱ्याच्या घरात घुसून साडेचार लाखांचा ऐवज लुटल्याच्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेच्या गंभीर नोंद घेत पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशाने गुन्हे शाखेसह परिमंडळ २ चे उपायुक्त रत्नाकर नवले यांनी तपास यंत्रणा वेगाने फिरवली असून दरोडेखोरांचा छडा लावण्यासाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. गुन्हे शाखेसह पाच पथके
दरोडेखोरांच्या मागावर आहेत. यातील काही पथके परराज्यातही रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने सोमवारी (दि.६) पहाटे ३ वाजेच्या सुमारास प्रतापनगरमध्ये ४० मिनिटे धुमाकूळ घातला होता. या घटनेनंतर गुन्हे शाखेची तीन, उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे एक आणि परिमंडळ स्तरावरील एक अशी एकूण पाच पथके सध्या दरोडेखोरांचा कसून शोध घेत आहेत. गुन्हे शाखेचे उपायुक्त
शशिकांत सातव, पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर तपासावर लक्ष ठेवून आहेत. व्यापारी संजय लाहोटी यांच्या घरात घुसलेल्या टोळीतील दरोडेखोर तेलगू आणि मोडक्या मराठीत संवाद साधत होते. या भाषेवरून दरोडेखोर राज्यालगतच्या सीमाभागातील असावेत, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांची विशेष पथके तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यांच्या सीमाभागात रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions