छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५ लाख रूपये रोख लंपास केले. ही घटना बनेवाडी परिसरातील पटेल प्राईड संकुलात घडली. याप्रकरणी अनिस अब्बास शेख रा. पटेल प्राईड यांनी सातारा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार २६ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूमधील कपाटात ठेवलेले ५ लाख रूपये रोख लंपास केले. पुढील तपास पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि एकीलवाले हे पुढील तपास करीत आहेत.











