पाच वर्षांच्या चिमुरडीवर रिक्षाचालकाकडून अत्याचार

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी शहराला मान खाली घालायला लावणारी संतापजनक घटना सातारा परिसरात उघडकीस आली आहे. ओळख असलेल्या एका ४७ वर्षीय रिक्षाचालकाने चॉकलेटचे आमिष दाखवून ५ वर्षांच्या चिमुरडीला सोबत नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून सातारा पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १८) 'पोक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, नराधम रिक्षाचालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या आईने ओळखीच्या आरोपी रिक्षाचालकाला सकाळी मुलीला शाळेत सोडण्यास आणि दुसऱ्या एका रिक्षाचालकाला
दुपारी तिच्या कामाच्या ठिकाणी आणून सोडण्यास सांगितले. दुपारी आईकडे आल्यावर दिवसभर थांबून मुलगी कंटाळत असल्याने आईने तिला जवळच राहणाऱ्या नातेवाईक महिलेकडे सोडण्यास सुरुवात केली होती.
आरोपी जुन्या ओळखीचा असल्याने ११ ते १४ ऑगस्टदरम्यान दुपारी तो मुलीला महिलेच्या कामाच्या ठिकाणाहून नातेवाइकाकडे सोडत होता. १५ ऑगस्टच्या कार्यक्रमानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास आरोपी हा पीडित मुलगी आणि तिच्या आईला घरी सोडण्यासाठी आला होता. चॉकलेटचे आमिष दाखवून त्याने मुलीला नेले. १५ ते २० मिनिटांतच तो मुलीला घेऊन परत आला. त्यावेळी ५ वर्षांची चिमुरडी रडत होती. कारण विचारले असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे देऊन तेथून पळून गेला.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions