डोनेशनच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या वाळूजमध्ये ५ परप्रांतीय तरुणी ताब्यात

Foto

छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो) : वाळूज एमआयडीसी औद्योगिक परिसरात अनाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली नागरिकांची लूट करणाऱ्या एका परप्रांतीय टोळीचा दामिनी महिला सुरक्षा पथकाने पर्दाफाश केला आहे. अनाथ मुलांना डोनेशन देण्याच्या बहाण्याने वाहनधारक व पादचाऱ्यांना अडवून पैशांची
मागणी करणाऱ्या ५ परप्रांतीय तरुणींना पथकाने शनिवारी (दि. २७) ताब्यात घेतले. हा प्रकार माजी उपसरपंच हरिश्चंद्र मातकर यांनी दामिनी पथकाला माहिती दिल्यानंतर तरुणींना सातारा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले.
वाळूज औद्योगिक क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून गुजरात राज्यातील तरुणींकडून अनाथ
चॅरिटेबल ट्रस्टमधील मुलांच्या संगोपनासाठी डोनेशनच्या नावाखाली नागरिकांना रस्त्यात अडवून पैशाची मागणी करत होत्या. गल्लीबोळात, दुकाने, कारखाने, शेड व वाहनधारक, पादचाऱ्यांकडून हजारो रुपये उकळले जात होते. शनिवारी सकाळी या महिला बजाज गेट-वाल्मी रस्त्यावरील पेरे चौकात वाहने अडवून नागरिकांकडून
पथकाने पाचही तरुणींना कारवाईसाठी सातारा पोलीस ठाण्यात हजर केले. यापूर्वी देखील एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तसेच हा फसवणूक अथवा याआडून लहान मुलांचे अपहरण होण्याची भीती आहे. यामुळे पालक व नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच कुठल्याही भुलथापांना बळी न पडता अशा घटनेची माहिती दामिनी पथकाला द्यावी.
- निर्मला अंभोरे (दामिनी पथक)
पैसे उकळत असल्याचे लक्षात आले. हा प्रकार गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सुरू आहे. दामिनी पथकाने कारवाई करीत पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पीएसआय कांचन मिरघे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions