पुराच्या पाण्यात जलविद्युत केंद्र समोरील भराव गेला वाहून

Foto
पुराच्या पाण्यात जलविद्युत केंद्र समोरील भराव गेला वाहून 

जलविद्युत केंद्र सुरू होण्यावर प्रश्नचिन्ह 

रमेश लिंबोरे 
पैठण 
नाथ सागर जलाशयातून गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आलेल्या तीन लाख सहा हजार पाचशे क्यूसेक पाण्यामुळे जलविद्युत केंद्र समोरील सिमेंट काँक्रीटचा थर (चर )  भराव पूर्णपणे वाहून गेला आहे. पिचिंग चे दगडे अस्तविस्त विखरलेली आहे त्यामुळे जलविद्युत केंद्र पुन्हा दोन-तीन वर्ष सुरू होण्याची शक्यता कमीच आहे.नाथसागर जलाशयातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पैठण शहरातील तसेच तालुक्यातील १४ गावांना पुराचा फटका बसला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना यापूर्वी अतिवृष्टीचा सामना करावा लागला होता त्याचे पंचनामे अद्याप पर्यंत प्रलंबित आहेत मदतही मिळाली नाही असे असताना पुन्हा त्यांना महापुराचा सामना करावा लागला आहे गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या १४ गावात पुराचे पाणी शिरून शेतकऱ्यांचे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. याचबरोबर पैठण शहरातही नागरिका सोबतच व्यापाऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे . घरांचे पंचनामे झाले आहेत परंतु अद्याप पर्यंत व्यापाऱ्यांच्या दुकानाचे पंचनामे सुरू आहेत.काही व्यापारी कडे शॉप अॅक्ट लायसन नसल्याने त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे मात्र लायसन नसल्यामुळे पंचनामे करण्यात अडथळे निर्माण होत आहे.
*२००६ मध्ये सरसकट पंचनामे*
२००६मध्ये नाथसागर जलाशयातून जवळपास तीन लाख क्यूसेक पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आल्यामुळे व्यापाऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यावेळी कोणत्याही प्रकारे नियम अटी न लावता सरसकट पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत देण्यात आली होती.
*जलविद्युतकेंद्राची पीचींग गेली वाहून* 
नाथसागर जलाशयाच्या पायथ्याशी असलेल्या जलविद्युत केंद्राच्या समोरील पिचिंग,भराव २०२३,२०२४ मध्ये नाथसागर जलाशयातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे वाहून गेली होती.या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून सिमेंट काँक्रेटचे बांधकाम करण्यात आले होते तसेच मातीचा भराव टाकण्यात आला होता परंतु सदरील कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्यामुळे सिमेंट काँक्रेट पूर्णपणे उकडून पडले असून पिचींगचे दगडे ही अस्तव्यस्त झालेले दिसत आहे.या ठिकाणी जवळपास दहा ते पंधरा फूट चा भराव पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला असून अनेक झाडे सुद्धा मुळासकट उखडून पडली आहेत.तसेच दक्षिण जायकवाडी व जल विद्युत केंद्राकडे जाणारा डांबरी रस्ता पूर्णपणे उखडून गेला असून डांबर जागोजागी विखरलेले दिसत आहे.तसेच जलाशयाच्या पायथ्याशी  ५०ते ६० वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या पुलावरील सिमेंट काँक्रीटचे थर सुद्धा वाहून गेले आहे.पूलाला अनेक ठिकाणी तडे गेले आहे त्यामुळे वाहन चालकांना या रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे.
जलविद्युत केंद्र समोरील भराव पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या मुळे आधीच चार-पाच वर्षापासून बंद असलेले जलविद्युत केंद्र आणखी काही वर्ष बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.