जवळील नाल्याला पूर ; दुचाकी वाहिल्या

Foto


अवघ्या अर्धा तास कोसळलेल्या धो-धो पावसाने शहरात दाणादाण उडवली. औषधी भवन जवळील नाल्याच्या पुरात तब्बल आठ ते दहा दुचाकी वाहत आल्या.

गेल्या दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर आज दुपारी पुन्हा एकदा आकाशात ढगांची गर्दी झाली होती. चारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. या पावसाने सिडको हडको, शहागंज, औरंगपुरा, गारखेडा परिसर आदी भागात पाणीच पाणी केले. रस्त्यावरून नदी वाहिल्याचे चित्र दिसून आले. नाले तुडुंब भरून वाहू लागले. त्यातच औषधी भवन जवळील नाल्याला मोठा पूर आला. या भागात पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकी या नाल्यात वाहत आल्या. गेल्या काही वर्षात या नाल्याला एवढा मोठा पूर पहिल्यांदा झाल्याचे नागरिकांनी सांगितले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker