नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी फुलांचे दर निम्म्यावर !

Foto
गुलाब १५० वरून ८०, शेवंती १०० रुपयांवर
(छाया: सचिन भंडारे)
न
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शारदीय नवरात्रोत्सवाच्या
पहिल्या दिवशी फुलांचे दर चढे होते, मात्र दुसऱ्याच दिवशी निम्म्यावर आले आहेत. एकाच दिवसात गुलाब आणि शेवंतीच्या दरात कमालीची घसरण झाली असून, झेंडूचे दरही ६० रुपयांवरून थेट २० रुपये किलोवर आले आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीत ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
-
रंगारगल्ली येथील फुलबाजारात गेल्या चार दिवसांपासून फुलांची T मागणी वाढल्याने दर वधारले होते. मात्र, नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मागणी कमी झाल्याने दरात घसरण झाली. कालपर्यंत १५० रुपये किलो असलेला गुलाब आज ८० रुपयांवर आला, तर २०० रुपये किलो दराने विकली जाणारी पांढरद्दी शेवंती १०० रुपये किलोवर आली आहे. झेंडूच्या फुलांचे दरही ६० रुपयांवरून २० रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. सध्या गुलाब आणि शेवंतीच्या फुलांना सर्वाधिक मागणी असल्याची माहिती फुलविक्रेते मुश्ताक शेख यांनी दिली.
न T
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions