छत्रपती संभाजीनगर, नरुला इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (एनआयपीएल ग्रुप) यांच्या पुढाकाराने सुरक्षा सप्ताह निमित्ताने सुरक्षा जनजागृतीसाठी रोड सेफ्टी रॅली आज सकाळी रेल्वे स्टेशन ते क्रांती चौक या मार्गावर काढण्यात आली. सुरक्षा संकल्प २०२६ रोकथाम से रक्षा या संदेशासह प्रभावी रोड सेफ्टी जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी वाहतूकीचे नियम पाळा, सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले.
रॅलीचे नेतृत्व मकबूल शेख यांनी करत नागरिकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन आणि सुरक्षित ड्रायव्हिंगचे महत्त्व अधोरेखित केले. सहनेतृत्व संभाशिव दगावणकर यांनी करत संपूर्ण टीमने उत्साहाने सहभाग नोंदवला. सुरक्षित वेग, सुरक्षित जीवन हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवत अपघातमुक्त समाज घडवण्याचा दृढ संकल्प या उपक्रमातून करण्यात आला. या उपक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद समाजातील जागरूकता आणि जबाबदारीची भावना अधिक बळकट करणारा ठरला. सर्व सहभागी, स्वयंसेवक आणि सहकार्य करणार्या प्रत्येक व्यक्तीचे यावेळी आभार मानले.
आपली सुरक्षा आपल्या हातात
प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे. रोड सेफ्टीसाठी आपली सुरक्षा आपल्या हाती असा अनोखा संदेश देणारी रॅली सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. यावेळी वाहतुकीचे नियम पाळावे. त्यात सुरक्षेसाठी हेल्मेट वापरा, वाहतुकीचे नियम पाळावे, इतकेच नव्हे वाहन चालवताना सिटबेल्टचा वापर करा, सिग्नल तोडू नका. असे आवाहन करत रॅलीतून वाहतूक सुरक्षेसाठी जनजागृती केली.















