फडणवीसांपाठोपाठ मुख्यमंत्री ठाकरे कोकण दौर्‍यावर जाणार

Foto
तौक्‍ते चक्रीवादळाने गेल्या पाच दिवसांपासून मुंबईच्या समुद्रकिनारी भागात धुमाकूळ घातला होता. कोकणात अनेक गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोकण दौर्‍यावर जाणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणातील नुकसानग्रस्त भागाची लवकरच पाहणी करणार आहे. आज महाविकास आघाडी सरकारची बैठक बोलावण्यात आली आहे. या कॅबिनेट बैठकीमध्ये राज्यात कोणकोणत्या भागात किती नुकसान झाले आहे. याची चर्चा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर काय मदत जाहीर करायची याबद्दल निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याचे आदेश आधीच जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे.
दरम्यान, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस आजपासून तीन दिवस चक्रीवादळाचा फटका बसलेल्या तीन जिल्ह्यात दौरा करत आहेत. त्यानंतर लगेच राज्य सरकारच्या वतीने देखील मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार या जिल्ह्यात उद्या दौरा करणार आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी व नुकसानग्रस्त यांना तातडीने मदत मिळण्यासाठी विजय वडेट्टीवार मंत्री आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन हे दिनांक 20 ते 23 मे चार दिवस कोकण दौर्‍यावर जाणार आहेत. उद्या गुरुवारला ताम्हणी, मानगड, मसळा, श्रीवर्धन, शुक्रवारला रत्नागिरी जिल्हा, शनिवारला सिंधुदुर्ग जिल्हा, रविवारला पालघर व ठाणे जिल्ह्यात पाहणी करून आढावा बैठक घेणार आहेत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker