कै. दादा चौके यांच्या पुण्यतिथीनिमित्त अन्नदान

Foto
पैठण, (प्रतिनिधी) पैठण येथील इंटक कामगार संघटनेचे दिवंगत नेते दादा चौके यांच्या १४ व्या पुण्यतिथी निमित्त ओंकार मुकबधीर व अस्थिव्यंग निवासी शाळेतील १२० चिमुरड्यांना सुग्रास भोजन देण्यात आले. 

सरस्वती दादा चौके व रामा दादा चौके यांचे कुटुंबिय गेल्या १४ वर्षांपासून हा अनोखा व आदर्श उपक्रम राबवत आहेत. नगरसेवक जितू परदेशी यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या या सहभोजन कार्यक्रमास मुख्याध्यापिका अपर्णा गोर्डे, पूजा जाधव, प्रिया घोडके, पूजा वाघचौरे, अरुण पाचे, लक्ष्मण पाचोडे, राम दादा चौके, राजश्री प्रदीपसिंग शेवगावकर, ग्रीष्मा श्रीराम रावस, सरस्वतीबाई दादा चौके, मनीष राम चौके, संतोषी राम चौके, पूजा मनीष चौके, तेजस्विनी योगराज बुंदिले, दीप्ती आनंद लक्कडहार, विशाल करकोटक व वैष्णवी आकाश राजपूत हे उपस्थित होते.