बिबट्यासह बछड्यांच्या पाऊलखुणा; ढवळापुरी शिवारात घबराट

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): तालुक्यातील ढवळापुरी शिवारात बिबट्याच्या पायाच्या ढवळापुरी शिवारात पायाचे ठसेही आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वनविभागाने पिंजरा लावला तरी गेल्या वीस दिवसांत बिबट्याने सहा जनावरांचा फडशा पाडत दहशत निर्माण केली आहे.

या बिबट्यास जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून पिंजरा लावण्यात आला आहे. दरम्यान बुधवारी (दि.१०) आमचे शेकटा प्रतिनिधी यांनी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सोबत प्रत्यक्ष पिंजरा लावलेल्या ठिकाणी भेट दिली. त्यावेळी ठसे आढळून आल्याचे वनविभागाने मान्य केले. यामुळे परिसरात - आणखी भीती पसरली आहे. 

यावेळी एका शेतकऱ्यांनी - सांगितले की आसपासच्या आखाड्यावरील पाळीव कुत्रे अचानक गायब झाली आहेत. बिबट्याने त्यांची शिकार केली असावी असा अंदाज आहे. बिबट्याचा वावर दूधना धरण परिसरात आहे. यंदा धरणात पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणी मोठ्या क्षेत्रावर केली आहे. परंतू बिबट्यामुळे शेतमजूर, महिला शेतीकामासाठी येण्यास नकार देत आहे. शेतकरी सुध्दा दिवसा शेतात जाण्यासाठी घाबरत आहे.