सलग ३९ व्या वर्षी भद्रा मारुतीच्या पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

Foto
गजानन महाराज बारगळ यांच्या नेतृत्वाखाली 
वारकऱ्यांचा उत्साहपूर्ण प्रवास सुरू

खुलताबाद, (प्रतिनिधी) आषाढी वारीचे औचित्य साधत येथील श्री भद्रा मारुती पायी दिंडीने सलग ३९ व्या वर्षी मोठ्या भक्तिभावाने पंढरपूरकडे प्रस्थान केले. गजानन महाराज बारगळ यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या दिंडीत वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून ऋङ्घज्ञानोबा - तुकारामङ्गङ्गच्या जयघोषाने आणि विठ्ठलनामाच्या गजराने परिसर भक्तिमय झाला.

दिंडीच्या प्रस्थानापूर्वी श्री भद्रा मारुती मंदिरात विठ्ठल रुक्मिणी व श्री हनुमानाची विधिवत पूजा, आरती व हरिनाम कीर्तन करण्यात आले. त्यानंतर वारकऱ्यांना शुभेच्छा देत सुरक्षित व  मंगलमय प्रवासासाठी प्रार्थना करण्यात आली. दिंडी मार्गस्थ होताच भाविकांनी टाळ मृदंगाच्या गजरात, भगव्या पताका फडकवत आणि अभंग गात पंढरीच्या वाटेला सुरुवात केली. यावर्षीही दिंडीचे नेतृत्व गजानन महाराज बारगळ करत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी प्रवास करत आहेत. 

३९ वर्षे अखंडपणे सुरू असलेली ही दिंडी खुलताबाद परिसरातील धार्मिक परंपरेचे महत्त्वपूर्ण प्रतीक मानली जाते. या दिंडीमुळे समाजात भक्ती, एकात्मता, शिस्त आणि सेवाभावाची प्रेरणा मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर विठ्ठल नामाच्या 
गजरात दिंडी पंढरपूरच्या दिशेने रवाना :
दिंडीच्या प्रस्थानापूर्वी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष भागीनाथ मरकड यांच्या निवासस्थानी वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व वारकऱ्यांनी महाप्रसादाचा लाभघेतल्यानंतर विठ्ठलनामाच्या गजरात दिंडी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. 

यावेळी श्री भद्रा मारुती संस्थानचे अध्यक्ष मिड्डू बारगळ, बाबासाहेब बारगळ, कचरू बारगळ, शेळके आबा, बाळकृष्ण लोढे, ज्ञानेश्वर बारगळ, सौरभ कुलकर्णी, भागीनाथ मरकड, भाजपा जिल्हा अध्यक्ष संजय खंबाते, औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संदीप निकम, नगरसेवक सुरेश मरकड जिल्हा परिषद सदस्य विकास कापसे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, नगरसेवक योगेश बारगळ, नगरसेवक उमेश आवारे नगरसेवक सचिन पवार बंडू पाटील, किशोर महाराज, शिवाजी शिनगारे, सुरेश फुलारे यांच्यासह असंख्य वारकरी व भाविक उपस्थित होते. 

पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेली ही पायी वारी ही केवळ यात्रा नसून भक्ती, समर्पण आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी परंपरा आहे, सङ्घ अशी भावना गजानन महाराज बारगळ यांनी यावेळी व्यक्त केली. खुलताबाद परिसरातील नागरिकांनीही दिंडीवर पुष्पवृष्टी करून व वारकऱ्यांना शुभेच्छा देत निरोप दिला.