ज्ञानदीप शाळेत जागतिक वन्यजीव संवर्धन दिन उत्साहात
सिल्लोड, (प्रतिनिधी) जगातील सर्वात मोठ्या प्रमाणात तस्करी व शिकार होणारा प्राणी म्हणजे खवले मांजर (पेंगोलीन) अंगावर खवले असणारा एकमेव सस्तन प्राणी ही वैशिष्ट्य पूर्ण ओळख व हीच खवले धारी ओळख या वन्यजीवाच्या जीवावर उठली आहे. सर्व प्रकरच्या जंगलात विशेषतः डोंगरात हा वन्यजीव अधिवास करतो. अजिंठा डोंगरातील याचा अधिवासाची अपघाती नोंद झाली.
ती आजच्या बरोबर ५ वर्षा आधी 3 मार्च २०२१ रोजी सिल्लोड जवळ एका हॉटेलमध्ये विदेशात तस्करी करण्याच्या उद्देशाने मुंबई येथील तस्करांचे मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट पकडण्यात आले होते. त्यांच्या ताब्यातून हा जैवविविधतेचा महत्वाचा घटक सुखरूप सोडवून त्यास अधिवासात मुक्त करण्यात आला. २०२१ या एकाच वर्षांत सिल्लोड जवळच्या अजिंठा डोंगरात खवले मांजर तस्करीच्या ३ घटना घडल्या ज्या आजवर सह्याद्री पर्वत व कोकणातही एका वर्षात घडल्या नव्हत्या. तस्करांची नापाक पावले त्यांच्या दृष्टीने सुरक्षित समजल्या गेलेल्या अजिंठा डोंगराकडे वळली असल्याचे
वन्यजीव संवर्धक अभिनव प्रतिष्ठानचे डॉ. संतोष पाटील यांच्या लक्षात आले.
अनाड, तोंडापूर, देव्हारी, वडाळा ई ३ ठिकाणी ही तस्करी घडली होती व प्रत्येक घटनेत स्थानिक वन्यजीवांचे शिकारी यांचा धक्कादायक सहभाग उघडकीस आला होता. वनविभागा सोबत डॉ. पाटील यांनी संयुक्त रित्या डोंगरी भागात वनजागर हा जनजागृती पर उपक्रम राबविण्यात सुरुवात झाली. आज जागतिक वन्यजीव संवर्धन दिनाच्या निमित्ताने सिल्लोड येथील ज्ञानदीप विद्यालयात संस्थाध्यक्ष मधुकर गवळी यांच्या मार्गदर्शनाने वनसंवाद साधला. शाळेच्या मु. अ. वंदना दिवेकर, मु. अ. सतिष बडक व सहकारी शिक्षकांची यावेळी उपस्थिती होती. इयत्ता सातवीच्या पुस्तकात या वन्यजीवावर बेबी पेंगोलीन नाईट आउट हा धडा अभ्यासक्रमात आहे.
जंगलाचा डॉक्टर खवले मांजर का आहे, महत्वाचा झाडांना लागणारी वाळवी, मुंग्या हे या वन्यजीवाचे अन्न असून रोज अंदाजे लाखाहून अधिक उपरोक्त जीव खाऊन तो जंगलातील झाडांचे वाळवी, उधई पासुन संरक्षण करतो म्हणून यास जंगलाचा डॉक्टर म्हटलं जाते. जमिनीत बिळ करून राहणारा या जीवास कोणताही नैसर्गिक शत्रू नाही. फक्त माणूसच त्याच्या जीवावर पैशाच्या हव्यासा पोटी उठला आहे.
- डॉ. संतोष पाटील, वन्यजीव संवर्धक













