माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आज औरंगाबादेत ; दौलताबाद, औरंगाबाद शहर, पैठण येथे सभा

Foto

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात आज औरंगाबादेत सभांचे आयोजन केले असून यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य  निर्माण झाले आहे. सभेची सुरुवात  ७ फेब्रुवारी पासून औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद येथून होईल  दुपारी २ वाजता दौलताबाद येथे तर त्यानंतर औरंगाबाद शहरातील सिडकोतील राजीव गांधी मैदान या ठिकाणी सायंकाळी ६ वाजता सभा घेण्यात येईल. दिनांक ८ फेब्रुवारी  रोजी पैठण येथे प्रचंड जाहीर सभेचे आयोजन औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी कडून करण्यात आलेले आहे. 


अशोकराव चव्हाण यांनी यापूर्वी संघर्ष यात्रेतून संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा केला होता, ही जन संघर्ष यात्रा ज्या विधानसभा मतदारसंघात गेली नाही त्या विधानसभा मतदारसंघांमध्ये अशोकराव चव्हाण आता सभा सभा घेणार आहेत. या सभा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात निघालेल्या यलगार यात्रेमुळेदेखील जनसामान्यांचा कल काँग्रेस पक्षाकडे वाढत असल्याचे दिसत आहे. या यात्रेत आमदार सुभाष झांबड, आमदार डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष नामदेवराव पवार, यांच्यासह राज्य कार्यकारिणीवर असलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या समावेश आहे. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker